बंधाऱ्याच्या बांधकामात निकृष्ट रेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:08 PM2019-03-15T22:08:10+5:302019-03-15T22:08:28+5:30
तालुक्यातील निमणी गावाजवळील बारमाही वाहणाऱ्या माल टोकणी नाल्यावरील सिमेंट प्लग बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या चोरीच्या रेतीचा वापर केला असल्याने याबाबत व्हॉटस्अॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पंचनामा केला असून कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज रेतीचा साठा आढळून आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील निमणी गावाजवळील बारमाही वाहणाऱ्या माल टोकणी नाल्यावरील सिमेंट प्लग बंधाºयाच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाच्या चोरीच्या रेतीचा वापर केला असल्याने याबाबत व्हॉटस्अॅपद्वारे तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोका पंचनामा केला असून कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज रेतीचा साठा आढळून आला आहे.
निमनी-हिरापूर मार्गावर बारमाही वाहणाºया माल टोकणी नाल्यावर जवळपास २७ लाख रुपये खर्चून सिमेंट प्लग बंधारा बनविण्याचे काम सुरू आहे. बंधाºयाच्या कामात पवनी नाल्याची मातीमिश्रीत निकृष्ट दर्जाची पांढरी रेती चोरीने आणून कंत्राटदार वापरत असल्याची विश्वसनीय माहिती होती. सामाजिक कार्यकर्ते अभय मुनोत यांनी कामाच्या ठिकाणी पडून असलेल्या १५ ते १६ ब्रास रेतीचे फोटो घेऊन तहसीलदार कोरपना यांच्याकडे व्हॉट्सअपद्वारे तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर बुधवारी मंडळ अधिकारी, गडचांदूर व तलाठी यांनी बंधाºयाच्या कामाला भेट देऊन मोका चौकशी केली. यावेळी त्यांना १० ते ११ ब्रास रेती त्याठिकाणी साठवलेली आढळली. प्रकरणात चौकशी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे पाठविल्याची माहिती आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार मोरे यांच्याकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिसरातील अनेक सरकारी कामात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना खनिज संपत्तीचा वापर कंत्राटदार करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. निकृष्ट दर्जाची मातीमिश्रीत रेती असल्याने सिमेंट काँक्रिटीकरणाची गुणवत्ता ढाळसली जात आहे. बांधकाम अभियंत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना, असा सवाल अभय मुनोत यांनी केला. सदर कंत्राटदारावर कारवाईची मागणी तक्रारदाराने केलेली आहे.