आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याकरिता बहुजन समाजाने एक होण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:08 PM2018-01-09T23:08:18+5:302018-01-09T23:09:00+5:30
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : देशातील सरकार भारतीय संविधान बदलण्याच्या तयारीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याच्या तयारीत असणाऱ्या सरकारला धडा शिकविण्यासाठी आता सर्वांनी सज्ज असले पाहिजे. आंबेडकरी चळवळ ही दलितांपूरती मर्यादित न राहता ती बहुजनांचीही चळवळ झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृती सन्मान पुरस्कार प्रदान कार्यक्रम तथा जीवन बागडे यांचा गौरव सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेतळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते मारोतराव कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, रिपब्लिक पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, ब्रह्मपुरीच्या माजी नगराध्यक्षा रिता उराडे, समता सैनिक दलाचे मुख्य संघटक विमलसुर्य चिमणकर, रिपाइंचे नेते रोहीदास राऊत, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष भाऊ निरभवने, प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, अॅड.गोविंद भेंडारकर, अॅड.दिगांबर गुरपुडे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे कार्याध्यक्ष सत्यजीत खोब्रागडे, रिपाइंचे देशक खोब्रागडे, जेसा मोटवाणी, भदन्त अश्वघोष महाथेरो आदी उपस्थित होते.
यावेळी स्मृतीशेष गिरीशबाबू खोब्रागडे स्मृतीसन्मान पुरस्काराने जीवन बागडे यांना देऊन गौरविण्णयात आले. यावेळी पटोले म्हणाले, शासनाने मागासवर्गातील सर्वांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. हे सर्वात मोठे दुदैव आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी, संचालन प्रा.सरोज शिंगाडे तर उपस्थिताचे आभार पद्माकर रामटेके यांनी मानले. यावेळी सुधीर राऊत, डॉ.राजेश कांबळे, बंटी श्रीवास्तव, अभय रामटेके, देवानंद कांबळे, जनार्धन गेडाम, अशोक रामटेके उपसिथत होते.