बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:25 AM2019-05-25T00:25:34+5:302019-05-25T00:26:51+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला.

Bal Dhandarkar has 44 thousand 763 votes | बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य

बाळू धानोरकर यांना ४४ हजार ७६३ मताधिक्य

Next
ठळक मुद्देअधिकृत घोषणा : धानोरकर यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी येथील एमआयडीसी दाताळा मार्गावरील वखार महामंडळाच्या परिसरात झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांनी ४४ हजार ७६३ मतांनी भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांचा पराभव केला.
बाळू धानोरकर यांना पाच लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली तर भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांना पाच लाख १४ हजार ७४४ मते मिळाली. सर्व मतांच्या पडताळणीनंतर बाळू धानोरकर यांना रितसर विजयी घोषित करण्यात आले. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत निवडणूक निरिक्षक दिपांकन सिंन्हा आदी उपस्थित होते.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिलला मतदान घेण्यात आले होते. एकूण मतदारांची संख्या १९ लाख चार हजार ३२ होती. त्यापैकी १२ लाख ३१ हजार १४७ एवढे मतदान झाले असून त्याची टक्केवारी ६४.६६ आहे. या निवडणुकीत एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. त्यांना पोस्टल बॅलेटसह झालेले मतदान पुढील प्रामाणे आहे. बहुजन समाज पार्टीचे सुशील वासनिक यांना ११ हजार ८१०, बहुजन मुक्ती पार्टीचे गौतम नगराळे यांना २४५०, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे दशरथ मडावी यांना ३१०३, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे नामदेव शेडमाके यांना ३०१७, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे नितेश डोंगरे यांना ४७०१, प्राउटिस्ट ब्लॉक इंडियाचे मधुकर निस्ताने यांना १५८९, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांना एक लाख १२ हजार ७९ मते तर अपक्ष उमेदवार अरविंद राऊत यांना १४७३, नामदेव किन्नाके यांना ५६३९, मिलिंद दहिवले यांना २४२६, राजेंद्र हजारे यांना ४५०५ मते आहेत. चंद्रपूर मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या हॉलमध्ये १४ टेबल होते. याकरिता ३२८ कर्मचारी व प्रत्येक टेबलसाठी राजपत्रित दर्जाचे मतमोजणी पर्यवेक्षक व मतमोजणी सहाय्यक नियुक्त होते.

सर्वत्र विजयाचा जल्लोष
काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर हे विजयी झाल्याचे गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. त्यानंतर आज शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात जल्लोष साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव चंद्रपूर येथे काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. भद्रावती, वरोरा, गडचांदूर, मूल या ठिकाणी विजयी मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर येथेही विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धानोरकर यांच्या विजयाच्या व पक्षाच्या घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Bal Dhandarkar has 44 thousand 763 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.