मजुरीसाठी बालाघाटच्या मजुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:15 PM2018-05-14T23:15:01+5:302018-05-14T23:15:01+5:30

वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात बांबू, बांबू मोळ्या, फाटे व बिट कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय बालाघाटच्या मजुरांची मजुरी दोन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे संतप्त मजुरांनी कोठारी ग्रामपंचायत समोर सोमवारी ठिय्या मांडला.

Balaghat's laborers for wages | मजुरीसाठी बालाघाटच्या मजुरांचा ठिय्या

मजुरीसाठी बालाघाटच्या मजुरांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देवनाधिकारी गायब : दोन महिन्यांपासून मजुरीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : वनविकास महामंडळाच्या झरण वनपरिक्षेत्रात बांबू, बांबू मोळ्या, फाटे व बिट कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय बालाघाटच्या मजुरांची मजुरी दोन महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे संतप्त मजुरांनी कोठारी ग्रामपंचायत समोर सोमवारी ठिय्या मांडला.
मागील दोन महिन्यांपासून बालाघाटचे मजुर झरण क्षेत्रातील कक्ष क्रमांक ३ मध्ये काम करीत आहेत. मात्र त्यांना दर आठवड्याला अ‍ॅडवान्स दिला जात नाही. आतापर्यंत केलेल्या कामाचे मोजमाप करण्यात आले. मात्र मजुरी देण्यात आली नाही. आता पावसाळा तोंडावर आला असून मजुरांना शेतीची कामे करायची घाई असल्याने आपल्या घरी जाण्याची धडपड सुरू आहे. मात्र केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने वनाधिकाºयांकडे मजुर सतत तगादा लावत आहेत. यानंतरही वनाधिकाºयांना पाझर फूटला नाही. सोमवारी कोठारीचा बाजार असल्याने मजुर आठवडाभराचे साहित्य तसेच भाजीपाला घ्यायला कोठारीत आले. मात्र त्यांच्याकडे एक रुपयाही नव्हता. मग बाजार कसा करायचा व आठवडाभर काय खाऊन काम करायचे, असा सवाल करीत ग्रा.पं. समोर ठिय्या धरुन बसले होते.

विभागीय कार्यालयात निधीची कमतरता होती. तसेच संबंधीत वनरक्षकाकडून देयके प्राप्त झाली नाही. मात्र चालू आठवड्यात मजुरांना बाजारासाठी दोनशे रुपये अडवॉन्स देण्यात आला आहे. १५ मे नंतर पूर्ण मजुरी देण्यात येईल.
- बी. सी उसेंडी
वनपरिक्षेत्र अधिकारी झरण.

Web Title: Balaghat's laborers for wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.