गोवरीतील बालाजी बोढे दीड महिन्यांपासून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:51 PM2017-10-20T23:51:18+5:302017-10-20T23:51:30+5:30
बहीण-भावाच्या नात्याला मानवतेचा स्पर्श आहे़ जिव्हाळा, आपुलकीने एकमेकांच्या सुख-दु:खात समर्पण होण्याची ही माया मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे़ मात्र,
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी: बहीण-भावाच्या नात्याला मानवतेचा स्पर्श आहे़ जिव्हाळा, आपुलकीने एकमेकांच्या सुख-दु:खात समर्पण होण्याची ही माया मानवी जीवनाला मिळालेले वरदान आहे़ मात्र, बेपत्ता झालेल्या भावाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करूनही निराशा वाट्याला आलेली गोवरी येथील एक बहिण भावाची आजही प्रतीक्षा करीत आहे़
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील बालाजी बोढे (५७) हे राजुरा शहरात जातो, असे सांगून दीड महिन्यांपूर्वी घराबाहेर निघाले़ परंतु, ते घरी परतलेच नाही़ कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक आणि जिल्ह्यातील अनेक गावांत शोध घेतला़ परंतु अजूनही शोध न लागल्याने संपूर्ण कुटुंब अजूनही चिंतेत आहे. मुलांनी वडील हरविल्याची तक्रार राजूरा पोलिसांत दाखल केली़ या घटनेला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला. परंतु शोध लागला नाही. भावाच्या जिवासाठी बहिणीनेही आटापिटा सुरु केला. पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही निराशा वाट्याला आली आहे़ ,आपला भाऊ भाऊबिजेला तरी घरी परत येईल, या एकाच आशेवर बहिण कांताबाई भावाची वाट पाहत आहे. भाऊबिज जवळ आल्याचे पाहून तिने पोलीस ठाणे गाठले़ भावाचा शोध कुठपर्यंत आला, अशी विचारणा केली़ तक्रार करूनही योग्यरितीने तपास का झाला नाही, असे प्रश्न उपस्थित केले़ परंतु, पोलीस प्रशासनाने मनाने घेतले नाही़ त्यामुळे आज भाऊबिज हा सण असूनही ओळवणी कुणाला करावी, असा प्रश्न कांताबाईने व्यवस्थेला विचारला आहे़ भाऊबिज हा बहिण - भावाच्या, आनंदाचा क्षण असताना आपला भाऊच घरी नसल्याचे दु:ख कांताबाईला आहे.
आपला भाऊ लवकर परत यावा यासाठी कांताबाई मनोमन पोलीस व प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे़
रविवारी गोवारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन
गडचिरोली : गोवारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांस्कृतिक मंगल कार्यालय आरमोरी मार्ग गडचिरोली येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत.