बाळापुरात ग्रामीण कलाकार संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:38 AM2018-04-11T01:38:40+5:302018-04-11T01:38:40+5:30

मुक्ताक्षर जीवनविद्या कला केंद्र ब्रह्मपुरीच्या वतीने बाळापूर (तळोधी) येथे ग्रामीण कलाकार संमेलन व कला ग्रंथ प्रदर्शन उत्साहात पार पडले.

Balakhat Rural Artists Convention | बाळापुरात ग्रामीण कलाकार संमेलन

बाळापुरात ग्रामीण कलाकार संमेलन

Next
ठळक मुद्देकलावंतांचा सहभाग : विविध पैलूंवर मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : मुक्ताक्षर जीवनविद्या कला केंद्र ब्रह्मपुरीच्या वतीने बाळापूर (तळोधी) येथे ग्रामीण कलाकार संमेलन व कला ग्रंथ प्रदर्शन उत्साहात पार पडले.
आजच्या धावपळीच्या जगात ग्रामीण लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. युवा पिढीला ग्रामीण लोककलेबद्दल माहिती व्हावी आणि लोककलेचा वारसा जपण्यासाठी या संमेलनात कलावंतांनी उपस्थिती दर्शविली होती. सरपंच रेवता कन्नाके यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गुरनुले तर प्रमुख पाहुणे ॅम्हणून भोजराज भानारकर, विकास धोंगडे, सविता उगेश्वर, मारोती ठेंगरे, विष्णू डेंगे, आदी उपस्थित होते. लोकलाल संमेलनात खंडीगंमत, पोवाडा, गोंधळ, दंडार, ओवी, अभंग, गौळण, नृत्य व नकला आदी कलांचे सादरीकरण करण्यात आले. २५ शाहिरी संच संमेलनात सहभागी झाले होते. मारोती ठेंगरे, विष्णू डेंगे, महादेव सहारे, व्यंकट नाकतोडे, शंकर शेंडे, राजेंद्र फुलझेले, पंढरी बेंदेवार, हेमंत भुते, भिमराव हिदघोरे, गुरु तुर्रा पार्टी देऊळगाव, तुळशिराम उंदिरवाडे आंबेटोला, मानव विकास पार्टी चुरमुरा, शामबाबु मेश्राम, रतन मेश्राम तपाळ, निलकंठ बावणे, मोहन धोंगडे, रमेश बनकर आदी कलावंतांनी कला सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. मान्यवरांनी पारंपरिक लोककलांचे महत्त्व सांगून अभ्यासकांनी या ग्रंथलेखन करावे, अशी भूमिका मांडली. परिसरातील नागरिकांनी संमेलनातील विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. मान्यवरांनी कलाकारांना प्रशस्तपत्र देऊन सत्कार केला. संचालन व प्रास्ताविक पांडुरंग डेंगे यांनी केले. मारोती ठेंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाळापूर व परिसरातील विविध गावांतील रसिकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
 

Web Title: Balakhat Rural Artists Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.