मनपाचे २७.४९ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

By admin | Published: June 24, 2017 12:38 AM2017-06-24T00:38:34+5:302017-06-24T00:38:34+5:30

महानगरपालिकेचा २०१६-१७ चा सुधारित आणि सन २०१७-१८ या वर्षाचा मूळ २७ लाख ४९ हजार ७८३ हजार रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आला.

Balance budget of 27.49 lakh | मनपाचे २७.४९ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

मनपाचे २७.४९ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

Next

सभागृहात मंजुरी : मॉडेल स्कूल, स्मशानभूमी, स्वच्छता अभियान व वाहनतळासाठी तरतूद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेचा २०१६-१७ चा सुधारित आणि सन २०१७-१८ या वर्षाचा मूळ २७ लाख ४९ हजार ७८३ हजार रुपयांचा शिलकी अंदाजपत्रक सभागृहात सादर करण्यात आला. मनपाच्या स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी हा अंदाजपत्रक सादर केला. चर्चेअंती ३९१.३३ लाखांच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
वार्षिक बजेटमध्ये ३९१.०५ खर्च अपेक्षित आहे. सन २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात सुधारणा करून २०१७-१८ या आर्थिक वर्षात अखेरची शिल्लक ही २७ लाख ४९ हजार ७८३ रुपये एवढी आहे. मनपामध्ये बहुमत असलेल्या भाजपाने सत्ता हाती घेतल्यानंतर अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात अंदाजपत्रात कोणत्याही खर्चावर कात्री लावण्यात आली नाही. अनावश्यक खर्चावर तरतूद केली आहे.
मनपाच्या अंदाजपत्रकात मालमत्ता कर, सफाई शुल्क, बांधकाम परवानगी, भुयारी मल:निसारण योजना जोडणी शुल्क व वार्षिक शुल्क, गुंठेवारी आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यावर मनपाने भर दिला आहे. मालमत्ता कर व इतर करांच्या माध्यमातून ५७.९६ कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे. सफाई शुल्काच्या माध्यमातून २.८० कोटी, वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम परवानगीपोटी तीन कोटी रुपये, भुयारी मल:निस्सारण योजना अंतर्गत जोडणी शुल्क एक कोटी रुपये, भुयारी मलनिस्सारण वार्षिक शुल्क एक कोटी, गुंठेवारी प्रकरणी दोन कोटी, गोलबाजारमधील अतिरिक्त बांधकाम असणाऱ्या दुकानांना वार्षिक शुल्क ३०० रुपये प्रति चौ.फुट याप्रमाणे दहा लाख रुपये, एलबीटी सहायक अनुदानापोटी ३४.५० कोटी रुपये, बांधकाम परवाना व विकास शुल्कापोटी चार कोटी आणि बिओटी तत्वावर प्रकल्पातून दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला अपेक्षित आहे.
अपेक्षित उत्पन्नापेक्षा अधिक असलेला खर्च भागविण्यासाठी बजेटमध्ये काहीही नवीन स्त्रोत सूचविण्यात आले नाही. यात प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या निधीतूनच विकास कामावर भर देण्यात आला आहे. मनपाच्या मॉडेल स्कुलसाठी चार कोटी रुपये तर महिला व बालकल्याण विभागांतर्गत योजनांसाठी ६९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी ५० लाख रुपये आणि दिव्यांगासाठी साहित्य पुरविणे, शिबिरे व समुपदेशन केंद्रासाठी ५० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. मनपाचे वाढीव क्षेत्र व लोकसंख्या लक्षात घेता शहरात स्मशानभूमी अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. यात काही नादुरुस्त आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे बांधकाम तथा अस्तित्वातील स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Balance budget of 27.49 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.