वृक्ष लागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:56+5:302021-06-05T04:21:56+5:30

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात चार वर्षात १० लाखाच्या जवळपास रोपवन मंगल जीवने बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली ...

Balancing the environment through tree planting and conservation | वृक्ष लागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

वृक्ष लागवड व संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल

googlenewsNext

बल्लारशाह वनपरिक्षेत्रात चार वर्षात १० लाखाच्या जवळपास रोपवन

मंगल जीवने

बल्लारपूर : कोरोना संकटकाळात कोरोनाबाधितांना प्राणवायूची गरज भासू लागली आहे. यामुळे नागरिकांना आता जागतिक पर्यावरण दिनप्रसंगी वृक्ष लागवडीची आठवण होऊ लागली आहे. कारण झाड पर्यावरणासाठी महत्वाची आहेत. कारण ती वर्षाला २२ किलोपेक्षा जास्त कार्बन शोषून घेतात. त्यामुळे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातूनच पर्यावरणाचा समतोल साधू शकतो. ही संकल्पना लक्षात घेऊन बल्लारशाह वन परिक्षेत्रात ५० कोटी वृक्ष लागवड योजनांतर्गत मागील चार वर्षात अंदाजे १० लाखाच्या जवळपास विविध प्रजातीचे रोपवन उभे असून पर्यावरणाचा समतोल राखत आहे.

बल्लारशाह वन परिक्षेत्रात कारवा, कळमना, उमरी, मानोरा व बल्लारशाह या पाच बिटात दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये विविध मिश्र प्रजातीचे रोपवन नर्सरीत तयार करून लावण्यात येते.

मागील चार वर्षात बल्लारशाह वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मानोरा उपक्षेत्रात ३ हजार ९०० हेक्टरवर २ लाखाच्या जवळपास विविध प्रजातीचे रोपवन तयार करण्यात आल्याची माहिती क्षेत्र सहायक प्रवीण विरूटकर यांनी दिली.

बॉक्स

वनकर्मचारी सांगतात...

बल्लारशाह वन परिक्षेत्रातील रोपवनाबाबत सांगताना क्षेत्र सहायक भोवरे म्हणाले, जिथे वन आहे तिथे जीव आहे. अलीकडे कोरोना काळात प्राणवायू विकत घेण्याची वेळ आली आहे. याला पर्याय वृक्ष संवर्धनाचा आहे.आणि आम्ही वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करीत आहो. उमरी वन परिक्षेत्राचे प्रवीण बिपटे यांनी वृक्ष लागवडीची माहिती देतांना सांगितले की मिश्र प्रजातीची रोपवन आता बहरले आहे. कळमनाचे क्षेत्र सहायक पुरी व कारवाचे रुंदन कातकर यांच्या नर्सरीत लावलेल्या रोपवनाची वाढ संपूर्ण झाली आहे. बल्लारशाह वन परिक्षेत्रातील अधिकारी संतोष थिपे म्हणाले,त्यांच्या हद्दीत येणाऱ्या गावांना या वृक्ष लागवडीचा निश्चितच फायदा होईल. गावशेजारी घेतलेल्या वृक्ष लागवडीमुळे गावाच्या शोभेत भर पडते. गावाच्या जवळ जंगल उभे राहते. त्यामुळे गावकऱ्यांना प्राणवायू मिळण्यास मदत होते. तसेच वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होते. पर्जन्यमान वाढण्यास मदत होते. पावसाचे प्रमाण वाढेल, जमिनीची धूप थांबेल.

वृक्ष लागवड करताना वनाची निर्मिती, वनसंरक्षण आणि संवर्धन या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.

Web Title: Balancing the environment through tree planting and conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.