ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:01:09+5:30

देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अºहेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.

Baleshwar Dambari is situated 7 km from Brahmapuri | ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

ब्रह्मपुरीपासून ७ कि.मी.वरील भालेश्वर डांबरीरस्त्याविना

googlenewsNext
ठळक मुद्देकुणीही लक्ष देईना : उखडलेल्या गिट्टीच्या रस्त्यावरूनच ग्रामस्थांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : तालुका मुख्यालयापासून अवघ्या ७ किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वैनगंगा नदी काठावर वसलेले व जवळपास दीड हजार लोकसंख्येचे भालेश्वर हे गाव अद्यापही डांबरी रस्त्याविना आहे. रस्त्याचे खडीकरण झाले. परंतु रस्ता उखडला आहे. गिट्टीच्या खडतर रस्त्यावरून भालेश्वरवासीयांना दररोज पायपीट करावी लागत आहे.
देशाच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातही अलिकडे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. परंतु ब्रम्हपुरीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही डांबर लागलेला नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अऱ्हेर-नवरगाववरून तीन किमी अंतरावर असून कच्चा रस्त्यावरून भालेश्वरवासीयांची पायपीट सुरू आहे. येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अºहेर नवरगाव येथे शिक्षणासाठी जात असून वारंवार ब्रम्हपुरीला याच मार्गाने जावे लागते.
भाजीपाल्याचे गठ्ठेच्या गठ्ठे मोटारसायकल तसेच सायकलवरून शहरात न्यावे लागते. त्यावेळी या गावातील नागरिकांची चांगलीच दमछाक होते. येथील नागरिकांनी कित्येकदा शासनाकडे पक्क्या रस्त्याची मागणी केली. परंतु वेळोवेळी शासनाने येथील नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
आता आमचा कोणीच वाली उरला नाही, अशी संतप्त भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे. आतातरी या मार्गावर सिमेंट तर सोडून द्या पण डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी होत आहे. जागोजागी फुटलेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना आजपर्यंत अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक पडून जखमी झाले आहेत. काहींना तर रुग्णालयात उपचारासाठीसुद्धा दाखल करावे लागले आहे. मात्र झोपेचे सोंग घेऊन असलेल्या प्रशासनाला अजूनही जाग आली नाही.
ब्रम्हपुरी पासून अवघ्या सात किमी अंतरावर असलेले भालेश्वर हे गाव तालुक्यात हिरव्या तसेच ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असून शासनाला लाखो रुपयांचा महसूल प्राप्त करून देणारे गाव आहे. कारण या गावाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रातील रेतीची अख्या विदर्भात प्रचंड मागणी आहे.
येथील रेतीला चांगला भाव मिळत असल्याने रेती ठेकेदार येथील रेतीघाटाला चांगली बोली लावून सदर रेतीघाट लिलावात घेतात. मात्र सततच्या रेतीवाहतुकीमुळे भालेश्वर ते अऱ्हेर नवरगाव या तीन किमी खडीकरण झालेल्या रस्त्याची नेहमीच चाळण होते, हे विशेष.

Web Title: Baleshwar Dambari is situated 7 km from Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.