बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:18 PM2018-03-17T23:18:06+5:302018-03-17T23:18:06+5:30

Baliaraja to be set up today | बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

बळीराजा आज उभारणार नवचैतन्याची गुढी

googlenewsNext
ठळक मुद्देविकासाची आस : अन्यायकारक धोरणांनी शेतकरी हतबल

प्रकाश काळे ।
आॅनलाईन लोकमत
गोवरी : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. प्रत्येकाच्या घरी सुखसमृद्धी नांदावी, ही मनोकामना व्यक्त करण्याचा सोहळा. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. दरवर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे संकटाचा फेरा असतो. यंदाही आहे. त्यामुळे दिवस बदलतील, या आशेने नवे स्वप्न डोळ्यात साठवून नवचैतन्याची गुढी उभारण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने भरडून निघाला आहे. शेतकºयांनी डोळा भरून पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. अवकाळी गारपीट व पावसाने खरीप तसेच रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. हाती येणारा शेतमाल वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. गुढीपाडव्याला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असायचे. परंतु, ते दिवस आता संपण्याच्या मार्गावर आले आहेत. विविध प्रश्नांनी अस्वस्थ झाल्याने त्यांच्या चेहºयावर आनंद दिसत नाही. गुढीपाडव्याला शेतकरी समाधानी असायचा. पण, सरकारच्या अन्यायकारक धोरणांमुळे बळीराजा मनातून पूर्णत: खचला.
गुढीपाडव्याला घरी पुरणपोळी करून सालगडीला जेवण घातले जाते. ही परंपरा आजही कायम असली तरी चेहऱ्यावरचे दु:खी भाव लपविता येत नाही.
सालगडी ठेवण्याचे प्रमाण घटले
गुढी पाडव्याच्या दिवशी शेतकरी नवीन सालगडी ठेवण्याची परंपरा होती.
मात्र, दिवसेंदिवस शेती बिनभरवशाची होत आहे. पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. उत्पन्नच होत नसल्याने सालगड्याचा खर्च झेपत नाही. त्यामुळे शेतकरी सालगडी ठेवण्याचा करार या दिवशी करण्याचे प्रमाण आता घटत आहे. बरेच शेतकरी नाईलाजाने इतरांना ठेक्याने देतात. यातून गरीबी व शोषणाची मालिका सुरूच राहते.

Web Title: Baliaraja to be set up today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.