बल्लारपुरात दोन दिवसांत १४३ जणांना कोविशिल्ड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:57+5:302021-02-06T04:51:57+5:30
ग्रामीण व शहरी ६०९ सरकारी कर्मचाऱ्यांना लस देणार बल्लारपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या लढाईत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कोरोना ...
ग्रामीण व शहरी ६०९ सरकारी कर्मचाऱ्यांना लस देणार
बल्लारपूर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या लढाईत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी कोविशिल्ड लस देणे सुरू असून, दोन दिवसांत १४३ जणांना लस देण्यात आली आहे.
यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे ३५० सरकारी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्याचे उद्दिष्ट आहे, तर २८९ ग्रामीण परिसरातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल.
ग्रामीण रुग्णालयात पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डॉ.अर्पिता वावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. पहिली लस त्यांना देण्यात आली. यावेळी डॉ. गजानन मेश्राम, डॉ.अतुल कोहपरे, डॉ.डांगे, डॉ. साळवे, डॉ. सुकेशिनी कांबळे, आरोग्य सहायक सुरेश मेश्राम, अशोक तुरारे, सतीश विटेकर व सर्व अधिकारी कर्मचारीवर्गाची उपस्थिती होती. पहिल्या दिवशी ७७७ व दुसऱ्या दिवशी ६६ जणांना लस देण्यात आली.
यावेळी डॉ.अर्पिता वावरकर यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी, खासगी डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका इत्यादींना लस देण्यात येईल.