बल्लारपुरात आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:33 AM2021-08-25T04:33:27+5:302021-08-25T04:33:27+5:30

बल्लारपूर : एका वृद्ध व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर. तो सुदैवाने यातून बचावला. त्याला दुखापत मात्र ...

In Ballarpur came the suffix 'Dev Tari, who killed him' | बल्लारपुरात आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

बल्लारपुरात आला ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

Next

बल्लारपूर : एका वृद्ध व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेला. मात्र, त्याचे नशीब बलवत्तर. तो सुदैवाने यातून बचावला. त्याला दुखापत मात्र झाली. अचंबित करणारी घटना येथे मुख्य मार्गावर स्टुडिओ कलाकेंद्रासमोर सोमवारी दुपारी घडली. या व्यक्तीचे नाव शंकर मल्लाराम (७०), रा. फुलसिंग नाईक वॉर्ड, बल्लारपूर असे आहे.

शंकर मल्लाराम हे रस्त्याने पायी जात होते. मागून आलेल्या ट्रकचा धक्का त्यांना लागला आणि खाली पडल्यानंतर ट्रक खाली आले. ट्रक त्यांच्यावरून गेला. मात्र, ते बचावले. त्यात त्यांना दुखापत झाली. ट्रक न थांबता पुढे निघून गेला. कलाकेंद्राचे संचालक विनोद राजूरकर, गजानन राजूरकर, सुनील जैन, बबलू शेख यांनी शंकर त्यांना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. पुढे त्यांना उपचारार्थ चंद्रपुरात हलविण्यात आले आहे. शंकर यांच्या कुटुंबीयांनी ट्रक चालकाविरुद्ध तक्रार केली असून, पोलीस ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: In Ballarpur came the suffix 'Dev Tari, who killed him'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.