बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाचे धरणे आंदोलन
By admin | Published: March 2, 2017 12:25 AM2017-03-02T00:25:59+5:302017-03-02T00:25:59+5:30
बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने बिल्ट व्यवस्थापनाच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या बाजूला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बल्लारपूर : बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने बिल्ट व्यवस्थापनाच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या बाजूला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यात प्रामुख्याने कामगाराचे थकीत वेतन, अतिरिक्त उत्पादन बोनस, एलटीए रक्कम त्वरित देण्यात यावे, कंपनी नियमित चालायला हवी, सेवानिवृत्त कामगार आणि डेलिव्हिजन कामगारांची थकीत रक्कम देण्यात यावे, बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना व्यवस्थापनाने समस्येवर चर्चा करता बोलावणे, बल्लारपूर पेपरमील मजदूर सभा यांचे आर्थिक व्यवहाराची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी. तथा प्रशासनाने त्वरित व्यवस्थापनाच्या विरोधात श्रम कायद्यांतर्गत कारवाई करावी. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने हे एक दिवसीय आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शहर संघटक अध्यक्ष संजय लुटे आणि महामंत्री प्रशांत बहिरम यांनी केले. तसेच या आंदोलनात नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष शिवचंद द्विवेदी, मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बंडीवार, जिल्हा अध्यक्ष अॅड. शैलेश मुंजे, जिल्हा संघटक मंत्री मनोहर साळवे, तुषार देवपुजारी आदींनी उपस्थिती दर्शवली व मार्गदर्शनपर भाषणे दिली. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन एसडीओंना दिले.