बल्लारपूर नगरपालिका झाली ७१ वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:44+5:302021-01-04T04:23:44+5:30

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका बनवून आज ७१ वर्षे झाली आहेत. तत्पूर्वी हे गाव नोटेफाईंड एरिया (आताचे नगरपंचायत) या दर्जात ...

Ballarpur Municipality became 71 years old | बल्लारपूर नगरपालिका झाली ७१ वर्षांची

बल्लारपूर नगरपालिका झाली ७१ वर्षांची

Next

बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिका बनवून आज ७१ वर्षे झाली आहेत. तत्पूर्वी हे गाव नोटेफाईंड एरिया (आताचे नगरपंचायत) या दर्जात होते. गावाची लोकसंख्या दहा हजारांचे वर झाल्यानंतर ४ जानेवारी १९४९ ला नोटेफाईंड एरियामधून नगरपालिकेत परावर्तित झाले.

१९४१ ला या गावाची लोकसंख्या ८ हजार ७१२ एवढी कमी होती. दर दहा वर्षांनी ती याप्रमाणे वाढत गेली. १९५१ ला १२ हजार ४७१, १९६१ ला २० हजार ३५१, १९७१ लाख ३४ हजार २६८, १९८१ ला ६१हजार ३९८, १९९१ ला ८३ हजार ५११, २००१ ला ८९ हजार ९९५ तर २०११ ला ८९ हजार ४५२ अशी नोंदविण्यात आली आहे. २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये शहराची लोकसंख्या ५४३ ने घटली आहे, हे येथे उल्लेखनीय !

नगरपालिकेचे कार्यालय प्रारंभी गांधी चौकातील इमारतीत होते. आगीत इमारत पूर्णतः जळाल्यानंतर डॉ. आंबेडकर भवन ते रेल्वे स्टेशन रोडवर एका किरायाच्या घरात (आताचे काबरा निवास) नवीन कार्यालय झाले. नगरपालिकेचा कारभार तिथून चालायचा. शहराचा जलदगतीने विस्तार होऊ लागल्यानंतर चंद्रपूर रोडवर स्वतःच्या मालकीची इमारत बांधून सुमारे १९६० चे दरम्यान कार्यालय हलविण्यात आले. १९४९ पासून आजपर्यंत एकूण २६ नगराध्यक्षांनी या नगराचा कारभार सांभाळला आहे.

हरीश शर्मा हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. तीन नगराध्यक्ष जनतेच्या मतांवर निवडून आले. नोटेफाईंड एरियापासूनच या गावाला रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक, कोळसा खाण, लाकडाची मोठी बाजारपेठ, पावर हाऊस यामुळे महत्त्व प्राप्त झाले.

बॉक्स

पेपरमीलमुळे वाढली लोकसंख्या

नगरपालिका बनण्याच्या दरम्यान पेपरमील झाले आणि त्यापासून लोकसंख्या तीव्र गतीने वाढायला लागली. सोबतच लहान-मोठे उद्योग झाले. गेल्या काही वर्षांत नागरिक सुविधा, सौंदर्यीकरण याबाबत या शहराची झपाट्याने प्रगती झाली. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने बल्लारपूर तहसील झाले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रही निर्माण झाले.

Web Title: Ballarpur Municipality became 71 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.