बल्लारपूर न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ज्युनिअर अमिताभच्या हस्ते सत्कार

By admin | Published: January 16, 2017 12:46 AM2017-01-16T00:46:18+5:302017-01-16T00:46:18+5:30

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यूनिअर अमिताभ बच्चन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

Ballarpur NP Felicitations of cleanliness employees by junior Amitabh | बल्लारपूर न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ज्युनिअर अमिताभच्या हस्ते सत्कार

बल्लारपूर न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ज्युनिअर अमिताभच्या हस्ते सत्कार

Next

बल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यूनिअर अमिताभ बच्चन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
स्थानीय न.प. बचत भवनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्याधिकारी विपीन मुदधा, पर्यावरण मित्र सचिन वाझलवार, नगरसेवक येलय्या दासरप, मंडळाचे अध्यक्ष डॉ. झेड.जे. खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगर परिषदेचे सेवानिवृत्त स्वास्थ्य निरीक्षक शेख रहमान यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी मुदधा म्हणाले, स्वच्छतेबाबत सर्वांनीच जागरूकता बाळगल्यास शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल. तर मंडळाचे सचिव अ‍ॅड. नाजीम खान म्हणाले, बिग बी अमिताभ बच्चन हे स्वच्छता अभियानाचे दूत आहेत. मंडळाने त्याच अनुषंगाने त्यांच्याच चेहरा पट्टीचा ज्यूनि. अमिताभ बच्चन (फिरोज कान) यांना येथे आमंत्रित केले. यावेळी दासरप, शेख रहमान, वाझलवार यांचीही भाषणे झालीत. डॉ. झेड जे. खान यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती देत स्वच्छतेचे महत्व सांगितले. संचालन अंश रंथे यांनी तर आभार प्रदर्शन रियाज खान यांनी केले.
त्यानंतर क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रिएटीव माईन्ड स्कुलचे वार्षिकोत्सवाचे उद्घाटन ज्यू. अमिताभ यांचे प्रमुख उपस्थितीत बालाजी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी विपीन मुदधा, पो. निरीक्षक प्रदीप शिरस्कर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष डॉ. झेड. जे. खान यांनी प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांमधील गुणांवर प्रकाश टाकला. यावेळी ज्यूनि. अमिताभ, शिरस्कर, मुदधा, वाझलवार यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संचालन अंश तर आभार प्रदर्शन उज्वला खोब्रागडे यांनी केले. मुख्याध्यापिका अरविंदर अरोरा, प्रसन्ना लिंगाला व शिक्षिकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
माकडाच्या हल्ल्यात दोघे जखमी
मूल : येथील सुभाष नगर वार्डामध्ये एका मोठ्या माकडाने दोन दिवसांपासून लोकांवर हल्ले केले. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. याची माहिती वन क्षेत्र सहायक बालपाडे यांना देण्यात आली. त्यांनी सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांच्यासह पाहणी केली. व माकडला पकडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ballarpur NP Felicitations of cleanliness employees by junior Amitabh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.