बल्लारपूर पेपर मिल सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:51+5:30
सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिला टप्पा बांबू कटिंग केला जाणारा चिप्पर विभाग गेल्या दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : शहराची अर्थवाहिनी असलेले येथील बल्लारपूर पेपर मिल २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. कंपनीतील सातव्या क्रमांकाच्या पेपर मशीनकडून कागद उत्पादन त्याच दिवसापासून सुरू होईल, अशी माहिती बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे यांनी शनिवारी दिली .
सुमारे ५ हजार कर्मचारी असलेले हे मोठे उद्योग लॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवसांपासून बंद आहे. मात्र कोविड १९ च्या काही अटी कायम ठेवून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या कागद उद्योगाच्या उत्पादन प्रक्रियेचा पहिला टप्पा बांबू कटिंग केला जाणारा चिप्पर विभाग गेल्या दोन दिवसांपासूनच सुरू झाला आहे. पुढील टप्प्यातील विभागाचे सुमारे ५०० कर्मचारी कामावर येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. बल्लारपूर पेपर मिलचे बल्लारपूर युनीट प्रमुख सी. एच. वरलु आणि माजी खासदार व पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी हा उद्योग सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. हा मोठा उद्योग पूर्वरत सुरु झाल्यानंतर शहराचे चैतन्य परत येणार आहे.