बल्लारपूर पेपर मिलही बंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 01:23 PM2020-03-24T13:23:09+5:302020-03-24T13:23:35+5:30
कोरोनावर प्रतिबंधक ऊपाय म्हणून येथील सर्वात मोठा असलेला कागद उद्योग बल्लारपूर पेपर मिल बंद केली जाणार आहे . त्याची प्रक्रिया सोमवार पासूनच सुरू झाली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनावर प्रतिबंधक ऊपाय म्हणून येथील सर्वात मोठा असलेला कागद उद्योग बल्लारपूर पेपर मिल बंद केली जाणार आहे . त्याची प्रक्रिया सोमवार पासूनच सुरू झाली आहे .
कागद निर्मिती प्रक्रियेतला पहिला टप्पा असलेला बांबू कटिंग विभाग हा सोमवार पासूनच बंद करण्यात आला आहे. सध्या प्रक्रियेदरम्यान असलेला कच्चा माल संपल्यानंतर उत्पादन प्रक्रिया बंद केली जाणार आहे. कोरोनावर दक्षतेचा उपाय म्हणून पेपर मिल व्यवस्थापनाने ही पावले उचलली आहेत. सध्या या पेपर मिलमध्ये एकूण ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.