बल्लारपुरात दिवसभरात अनेकदा होते बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:33+5:302021-05-21T04:28:33+5:30
बल्लारपूर : वादळी वारा आणि पावसामुळे वीज कंपनीला बराच त्रास सहन करावा लागत आहे. अशात वारंवार विजेची बत्ती गुल ...
बल्लारपूर : वादळी वारा आणि पावसामुळे वीज कंपनीला बराच त्रास सहन करावा लागत आहे. अशात वारंवार विजेची बत्ती गुल होणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. यामुळे डेपो विभागातील वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
डेपो विभागात वादळ, वारा असो की नसो बत्ती गुल होणे नित्याचे झाले आहे. दिवसातून तीनदा बत्ती गुल झालीच पाहिजे, असा नियम झाला आहे. वीज कार्यालयास विचारले तर उडवाउडवीची उत्तर देतात. अभियंता तर बोलतच नाही. मात्र यामुळे बाधित नागरिकांना त्रास होत आहे. वीजपुरवठा वारंवार का खंडित झाला आहे, हे निदान शोधण्यास वीज अभियंते निरुत्साही दिसत आहेत. वर्षभर असेच सुरू असते, असे नागरिकांनी सांगितले. याबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अभियंता यांनी तोडगा काढावा, अशी मागणी डेपो विभागातील नागरिकांनी केली आहे.