बल्लारपूर पुन्हा एका हत्येने हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:05+5:302021-09-02T04:59:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारपुरात हिंसक सत्र सुरूच आहे. पुन्हा एका हत्याकांडाने बल्लारपूर हादरले आहे. ही घटना सोमवारी ...

Ballarpur was again shaken by a murder | बल्लारपूर पुन्हा एका हत्येने हादरले

बल्लारपूर पुन्हा एका हत्येने हादरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बल्लारपूर : बल्लारपुरात हिंसक सत्र सुरूच आहे. पुन्हा एका हत्याकांडाने बल्लारपूर हादरले आहे. ही घटना सोमवारी येथील स्क्वेअर पॉइंट बियर बारजवळ घडली. यातील दोन्ही आरोपी फरार आहेत. मिलिंद बोंदाळे (३२) रा.किल्ला वार्ड असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद बोंदाळे, सलमान शेख ( २४ ) व गणेश जंगम्मवार ( २४) रा.दादाभाई नौरोजी हे तिघेही मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांच्यात वाद झाला. प्रकरण शिवीगाळीवर आले. अशातच सलमान व गणेश यापैकी एकाने आजूबाजूला पडलेल्या फरशीने मिलिंदच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात मध्यस्थी करणारा गेलेला संघपाल कांबळे रा.गणपती वॉर्ड यालाही गंभीर इजा झाली आहे. जखमी अवस्थेत मिलिंद व संघपाल यांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी दोघांनाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांना तत्काळ चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने मिलिंदचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. संघपालवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. आरोपी फरार आहे. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, ३२२, ३२४, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमीज मुलानी करत आहे.

बल्लारपुरात पोलिसांचा वचक संपला?

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरापासून हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. दोन हत्येच्या घटनांमधील अवधीही आता कमी झाल्याचे वाटत आहे. बल्लारपुरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात बल्लारपूर पोलीस कमी पडत असल्याचे या घटनांवरून दिसून येत असल्याचे नागरिक आता बिनदिक्कत बोलू लागले आहेत.

Web Title: Ballarpur was again shaken by a murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.