बल्लारपूूर पोलीस ठाण्याची उंच भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:58 PM2018-10-11T21:58:07+5:302018-10-11T21:58:23+5:30

बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

Ballarpuri police station's high fare | बल्लारपूूर पोलीस ठाण्याची उंच भरारी

बल्लारपूूर पोलीस ठाण्याची उंच भरारी

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांचा पुढाकार : नवीन इमारतीचे शुक्रवारी लोकार्पण

वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस स्टेशनची भव्य आणि देखणी इमारत दिमाखात उभी झाली आहे. तिच्यासोबतच निवासी इमारतीचे लोकार्पण शुक्रवारला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रशस्त इमारतीचा दर्शनी भाग ऐतिहासिक किल्ल्याच्या परकोटाप्र्रमाणे सुशोभित, इमारतीत लहान मोठ्या एकूण २७ खोल्या आणि त्यात उत्तम आरामदायी आसन व्यवस्था, समोर छोटी बाग व पलिकडे मोकळे मैदान. ही साजसज्जा बघणारे म्हणतात एवढे प्रशस्त व देखणे पोलीस स्टेशन आम्ही प्रथमच बघतो आहोत. ना. मुनगंटीवार या नियोजित इमारतीबाबत भाषणात म्हणत असत की ही इमारत व तेथील व्यवस्था इतकी सुंदर असणार की, सर्वच भारावून जातील.
सुमारे ५० वर्षापूर्वी बल्लारपूरचे पोलीस स्टेशन वस्ती भागात गांधी चौकाजवळ तीन खोल्या असलेल्या कौलारू घरात होते. त्याच्या जवळच गांधी चौकाला लागून नगरपालिकेची इमारत होती. या इमारतीला आग लागून ती जळाल्यानंतर नगरपालिका कार्यालय कॉलरी ते रेल्वे उड्डाणपुल मार्गावरील एका इमारतीत आताचे काबरा यांचे निवासस्थान हलविण्यात आले. रविवारचा आठवडी बाजार ओळ, गांधी चौक, नेहरू चौक या क्षेत्रात रेल्वे लाईनच्या पलिकडे जंगल साफ होऊन तेथे लोकवस्ती बसली. प्रशासकीय इमारत शहराच्या मध्यभगी असावी, या हेतूने सन १९६३ च्या दरम्यान चंद्रपूर - बल्लारपूर या मार्गावर नगरपालिका तसेच पोलीस स्टेशन यांच्या इमारती बांधून तेथेही कार्यालय हलविण्यात आलीत. आजही कार्यालय या जागेवर आहेत. आठवडी बाजार ही गांधी चौकातून हलवून नगरपालिका भवनामागे भरविण्यात आली. गांची चौकातील पोलीस स्टेशनच्या जागी पोलिसांकरिता क्वार्टर्स उभे करण्यात आले. शहरातील पोलीस स्टेशन, नगरपालिका, आठवडी बाजार जवळ जवळ झाले आहेत. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस स्टेशनची सुसज्ज इमारत बांधण्याचा संकल्प दोन वर्षापूर्वी केला व पोलीस स्टेशन सोबतच पोलीस क्वार्टर नऊ कोटी ८९ लाख रूपये खर्च करून बांधले. पोलीस स्टेशनची इमारत देखणी व प्रशस्त झाली. यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या ही पुरेशी असणे गरजेचे आहे. कारण पुरेसे कर्मचारी नाहीत. अशी ओरड या पोलीस स्टेशनबाबत नेहमीच ऐकायला मिळते. याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Ballarpuri police station's high fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.