बल्लारशाह रेल्वे स्टेशन कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 12:47 AM2020-01-18T00:47:27+5:302020-01-18T00:49:59+5:30
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी तीन लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. प्लॅटफार्मच्या सरपेसमध्येही सुधारणा केली जात आहे. सर्व प्लॅटफार्मवर कोच डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन एफ.ओ.बी.चे काम सुरू झाले आहे. या व्यक्तिरिक्त महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्षालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर विविध विकास कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात येथे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहे.
रेल्वे क्षेत्रीय उपयोगकर्ता समितीचे सदस्य व चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळाव्या यासाठीे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन येथील समस्या सोडविण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. दरम्यान, सध्या रेल्वे प्रवाशांच्या हिताचे काम सुरु झाले असून याचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वीच मुंबई येथे रेल्वे अधिकाऱ्यांची रेल्वे समितीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. यामध्ये श्रीनिवास सुुचुंवार यांनी येथील स्टेशनवरील समस्यांसदर्भात निवेदन देत लक्ष वेधले होते. यावेळी रेल्वे अधिकाºयांनी येथील समस्या सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.
अशा राहणार सुविधा
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी तीन लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. प्लॅटफार्मच्या सरपेसमध्येही सुधारणा केली जात आहे. सर्व प्लॅटफार्मवर कोच डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन एफ.ओ.बी.चे काम सुरू झाले आहे. या व्यक्तिरिक्त महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्षालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे. येणाऱ्या काळात येथील ६ व ७ नंबरच्या प्लॅटफार्मची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व प्लॅटफार्मवर कवर ओवर प्लॅटफार्म विस्ताराचे कार्य सुरू झाले आहे.