महाप्रबंधकच्या दौऱ्यासाठी नटत आहे बल्लारशाह रेल्वे स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:15 AM2020-12-28T04:15:45+5:302020-12-28T04:15:45+5:30
महाप्रबंधक च्या दौऱ्यासाठी नटत आहे बल्लारशाह रेल्वे स्थानक = निर्जीव प्राण्यांच्या पुतळ्यांना मिळाली नवसंजीवनी = मंगल जीवने बल्लारपूर : ...
महाप्रबंधक च्या दौऱ्यासाठी नटत आहे बल्लारशाह रेल्वे स्थानक
= निर्जीव प्राण्यांच्या पुतळ्यांना मिळाली नवसंजीवनी
= मंगल जीवने
बल्लारपूर : इस्टर्न,वेस्टर्न आणि साऊथ या तिन्ही झोन चा संगम व मध्य झोन ( केंद्रीय रेल्वे ) चे शेवटचे रेल्वे स्टेशन बल्लारशाह जंक्शन चे निरीक्षण नवीन वर्षात जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होत असल्यामुळे निरीक्षण करण्यासाठी बल्लारपूर स्थानकावर दररोज रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्याच्या येरझारा सुरु आहे.व स्थानक परिसराचे रानरोगां करणे सुरु आहे
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर सर्वच रेल्वे गाड्यांचा थांबा असल्यामुळे या स्थानकाला महत्व देण्यात येते.येथे सर्व गाड्यांचे चालक,गार्ड,व तिकीट निरीक्षकाच्या स्टाफ बदली होतो.या स्थाकावरून दररोज ३८ सुपरफास्ट रेल्वेगाड्या धावतात तर १३४ साप्ताहिक गाड्यांच्या फेऱ्या होतात कोरोना काळात फक्त विशेष गाड्या सुरु आहे यामुळे रेल्वेची प्रवास यात्रा थोडी थंडावली असली तरी विकास कार्य जोरात सुरु आहे. यामुळे दर तीन वर्षांनी या स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी मुंबई हुन महाप्रबंधक रेल्वेच्या स्पेशल गाडीने येत असतात
" १२ फेब्रुवारी २००८ ला मध्य रेल्वे च्या महाप्रबंधक सौम्या राघवन यांनी बल्लारशाह स्थानकाला भेट देऊन " कर्मचारी सुविधा टर्मिनलव व कॉम्प्युटर मॅनेजमेंट सिस्टम " चे उदघाटन केले आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महिलांसोबत चर्चा केली.तर २०१२ मध्ये रेल्वे चे महाप्रबंधक सुबोध जैन यांनी बल्लारशाह स्थानकावरील अत्याधुनिक बेस किचन चे उदघाटन केले ( सध्या स्थितीत बेस किचन बंद आहे.) व रेल्वे च्या समस्या जाणून घेतल्या यानंतर महाप्रबंधक डि.के. शर्मा बल्लारशाह स्थानकाला भेट देऊन विकास कार्याचे निरीक्षण केले व रेल्वे ट्रक वर बसून पाहणी केली. आता तीन वर्षानंतर ८ जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात जीएम स्पेशल ट्रेन ने संजीव मित्तल येत आहे."ते बल्लारशाह ते सेवाग्राम या रेल्वे स्थानकावरील विक्स कार्याचे निरीक्षण करतील
अधिकाऱ्यांची भागंभाग
बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे निरीक्षण ला जीएम स्पेशल ट्रेन आगमन च्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागातील विभागीय अधिकाऱ्यांचे बल्लारशाहवर दररोज आगमन सुरु आहे. आतापर्यंत कमर्शियल विभागाचे अनेक अधिकारी,डीसीएम,सिनिअर विभागीय वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील ( कमर्शियल ) यांनी भेट देऊन स्टेशन प्रबंधक रामलाल सिंग व रेल्वे च्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.त्यानुसार रेल्वे स्टेशन वर डागडुजी प्लॅटफार्म ची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे सुरु आहे
" प्लेट फार्मवरील काही वन्य प्राण्यांच्या पुतळ्याची तुटफूट झाली होती सिनियर डीसीएम पाटील यांच्या निर्देशानंतर दोन वर्षाआधी बल्लारशाह प्लॅटफार्म वर लावलेल्या वन्यप्राण्यांची रंगोटी करण्यात आली असून प्रतीकात्मक वन्यप्राण्यांच्या पुतळ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे त्यात जिवंतपणा आला आहे "
= बल्लारशाह प्लेट फार्म वर लावलेले वन्यप्राण्यांचे पुतळे
- मंगल जीवने