बांबू कटाई मजुरांची वनकार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:26 PM2018-03-27T23:26:30+5:302018-03-27T23:26:30+5:30
बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.
मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेकडो मजूर बांबू कटाईसाठी जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मजूर काम करीत असतानाही त्यांना अद्यापही वनविभागाने मजुरी दिली नाही. याबाबत वारंवार विचारणा करूनही अधिकाºयांचे दुर्लक्षच झाले. यातच घरून आणलेले सर्व साहित्य संपल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली. त्यामुळे संतप्त मजुरांनी वनकार्यालयावर धडक दिली.
प्रत्येक मजुराची चार महिन्यांची जवळपास ५० हजार रूपये मजुरी थकीत आहे. बांबू कटाईच्या कामात ३०० मजूर असून त्यांची जवळपास दीड कोटींची मजुरी थकीत आहे, असे मजुरांनी सांगितले. दरम्यान गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, जिल्हा सचिव धिरज शेडमाके, गोंगपाचे जिल्हा सचिव गणपत नैताम यांनी मजुरांची भेट घेवून व्यथा जाणून घेतली. त्यानंतर वन अधिकाºयांची चर्चा केली.