अधिकृत बिटी बियाण्यांच्या विक्रीवर २० मेपर्यंत राहणार बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:17 PM2018-05-16T23:17:37+5:302018-05-16T23:17:53+5:30

मागील वर्षात चोर बीटी बियाण्यांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केल्याने शेतकऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगाव लागले होते. या हंगामात अधिकृत बिटी बियाण्यांसोबत विकल्या जाणाºया चोर बीटीवर लगाम लावण्याकरिता शासनाने २० मेपर्यंत अधिकृत बीटी बियाणे विक्रीवर निर्बंध लावले आहे.

Ban on official bt seeds sale till May 20 | अधिकृत बिटी बियाण्यांच्या विक्रीवर २० मेपर्यंत राहणार बंदी

अधिकृत बिटी बियाण्यांच्या विक्रीवर २० मेपर्यंत राहणार बंदी

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाची उपाययोजना : चोर बिटी बियाणे विक्रीवर लगाम

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील वर्षात चोर बीटी बियाण्यांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केल्याने शेतकऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगाव लागले होते. या हंगामात अधिकृत बिटी बियाण्यांसोबत विकल्या जाणाºया चोर बीटीवर लगाम लावण्याकरिता शासनाने २० मेपर्यंत अधिकृत बीटी बियाणे विक्रीवर निर्बंध लावले आहे.
येत्या काही दिवसात शेतकरी शेताची पेरणीपूर्व मशागत पूर्ण करून बियाणे घेण्याकरिता धावपळ करणार आहे. कपाशीचा पेरा मागील वर्षी एवढाच राहील. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. हंगामाच्या सुरूवातीला कपाशीचे बीटी बियाणे घेताना अधिकृत बिटी बियाणे बाजारात मिळणार नाही. त्याचा तुटवडा जाणवणार असल्याची अफवा काही अनधिकृत विक्रेते करू शकतात. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा. अधिकृत बीटी बियाण्यापेक्षा किमतीत कमी व उत्पादनाची एकदम हमी म्हणत शेतकऱ्यांच्या हाती चोर बीटी बियाणे देण्याची शक्यता वर्तवित चोर बीटी बियाणे शेतकऱ्यांना उधारीवरही देण्याची शक्यता असल्याने त्यास शेतकरी बळी पडू शकतात. यावर कृषी विभागाने अनेक उपाययोजना आखत अधिकृत बियाणेच घ्यावे, याकरिता जनजागृती करणे सुरू केले आहे. अनधिकृत बियाणे पकडण्याकरिता ठिकठिकाणी पथकही निर्माण करून पथकास दक्ष राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. अशाही प्रसंगी अनधिकृत कपासीच्या बियाण्यांची विक्री होऊ नये. अधिकृत बियाणे हंगामापूर्वी विकून त्याचा तुटवडा दाखवित चोर बीटी बियाणे घेण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती तयार होऊ नये, याकरिता शासनाने २० मेपर्यंत अधिकृत बीटी बियाणे विक्रीवर निर्बंध घातले असल्याची माहिती आहे. मान्सून लांबणीवर गेल्यास अधिकृत बीटी बियाण्यांच्या विक्रीवर बंदी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाजारामध्ये शासनमान्य अधिकृत बीटी बियाणे मागणीनुसार उपलब्ध आहे. त्यामुळे विक्रीवरील बंदी उठल्यानंतर अधिकृत बीटी बियाणे घेऊन देयक घ्यावे व हे देयक जपून ठेवावे. अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.
- व्ही.आर. प्रकाश,
तालुका कृषी अधिकारी, वरोरा.

Web Title: Ban on official bt seeds sale till May 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.