पीओपी मूर्ती विक्रीवर बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:39 PM2018-09-08T22:39:56+5:302018-09-08T22:40:24+5:30
पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पीओपी मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जल व जमीन प्रदूषण होते. मात्र तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन पोअीपी मूर्ती विक्रीवरच सरसकट बंदी घालावी, अशी मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
चार दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेशभक्त गणेशाच्या स्वागताची तयारी करीत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्तीचा समावेश आहे. या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे शासनाने या मूर्तीच्या विर्सजनावर बंदी घातली आहे. गणेशभक्तांना या मूर्तीचे विर्सजन जलकुंडामध्ये करता येते.
मात्र जलकुंडामध्ये विर्सजन केल्यानंतर जमा झालेले मूर्तीचा मलबा जमिनीमध्ये पुरण्यात येत असते. मलबा जमिनीत पुरण्यात येत असल्यामुळे जमिनीसुद्धा प्रदूषण होत असते. त्यामुळे प्रशासनाने या मुर्र्तीच्या विक्रीवरच बंदी घालावी, अशी मागणी समाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतूरे, सुभाष तेटवार, अॅड. हरीश मंचलवार, शाहिदा शेख, संजय मार्कंडवार, रवी येरावार, रोशन इसलवार, राकेश राजुरकर यांनी केली.
मनपाने पुढाकार घ्यावा
शासनाने पीओपी मूर्तीच्या विर्सजनावर बंदी घातली आहे. मात्र जलकुंडामध्ये मूर्तीचे विर्सजन करता येते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था पीओपी मूर्तीच्या विक्रीवर बंदी घालू शकते. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र चंद्रपूरात अशी बंदी घातली नाही. त्यामुळे सर्रास पीअीपी मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. त्यामुळे अनेक गणेश मंडळ पीओपी मूतीची स्थापना करतात आणि त्याचे विसर्जन जलकुंभामध्ये करतात. आणि जलकुंभात विर्सजन झालेला मलमा जमिनीमध्ये पुरत असल्याने जमिनीचे प्रदूषण होते. त्यामुळे मनपाने पुढाकार घेऊन बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
मनपामध्ये बैठक
मागील काही दिवसांपूर्वी मनपामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कुंभार समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समाजातील पदाधिकाऱ्यांनी पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र मूर्तीवर बंदी घालण्यामध्ये मनपा उदासीन दिसली. आम्ही जनजागृती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र जनजागृतीही मोठ्या प्रमाणात करत नसल्याने अनेकजण पीओपीच्या मूर्तीची खरेदी करीत आहेत.