बेंबाळ प्रादेशिक योजना पाच दिवसापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:01 PM2019-06-10T23:01:52+5:302019-06-10T23:02:09+5:30
रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोसरी : रखरखत्या उन्हात सर्वांगाची काहीली सुरू असताना बेंबाळ प्रादेशिक योजनेच्या गळती दुरूस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे बेंबाळ- नांदगाव परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली.
बेंबाळ प्रादेशिक योजनेद्वारे परिसरातील सात गावाकरिता पाणी पुरवठा केला जातो. भूगर्भातील पाणी खोलवर गेली असल्याने विहिरी व हातपंप कोरडे झाल्या. बेंबाळ प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन नहराचे खोलीकरणामुळे फुटली. यातून पाणी वाया जात आहे.
परिणामी, पाच दिवसापासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाणी टंचाईमुळे कॅनला सुगीचे दिवस आले. शुध्दतेच्या नावाखाली अशुध्द पाण्याची सर्रास विक्री सुरू आहे. याचा परिणाम आरोग्य होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे याकडे लक्ष दिले पाहिजे.
नियोजनाचा अभाव
बेंबाळ प्रादेशिक नळ योजना सात गावांसाठी उपयुक्त ठरले आहे. या प्रकल्पाचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळात पिण्याच्या पाण्याची टंचाई कदापि निर्माण होऊ शकत नाही. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी ऐन उन्हाळ्यात अडचणी निर्माण होतात. ही समस्या ्र कायमची दूर केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.