मजीप्रा कार्यालयावर बँडवाजा आंदोलन
By admin | Published: September 23, 2016 01:06 AM2016-09-23T01:06:47+5:302016-09-23T01:06:47+5:30
नागरिकांना व्यवस्थित पाणी पिण्यास मिळावे, अशी मागणी करीत नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या
यंत्रणेचा निषेध : चंद्रपूर शहराचे पाणी पेटले
चंद्रपूर : नागरिकांना व्यवस्थित पाणी पिण्यास मिळावे, अशी मागणी करीत नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर अंत्यविधीचा बँड वाजा वाजवित पाणीपुरवठा यंत्रणेचा निषेध केला. यावेळी चंद्रपूर जिल्हा पाणी पुरवठा संघर्ष समितीने निवेदन सादर करून मजीप्राने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरातील पाण्याची समस्या तापत होती. मात्र याकडे कुणीही लक्ष नाही. शेवटी चंद्रपूर जिल्हा पाणीपुरवठा संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाची नोटीस दिली असता मनपाकडून पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले. महापौर राखी कंचर्लावार, आयुक्त संजय काकडे व प्रभारी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्रीगादेवार यांनी चर्चा केली. त्यावेळी विविध उपाययोजनावर विचार करण्यात आला. चर्चेमध्ये मनपाने त्वरित योग्य कारवाईचे आश्वासन दिले ही योजना महाराष्ट्र प्राधिकरणाने पूर्ववत चालवावी, असा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडे दिला आहे. परंतु मजीप्रा चालविण्याच्या मन:स्थितीत नसल्याने एवढी मोठी यंत्रणा मनपाच्या अवाक्यात नाही, याची जाणीव चर्चेत करून देण्यात आली.
बँडवाजा वाजवित मोर्चा उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीकडे निघाला. उज्ज्वल कंस्ट्रक्शनला निवेदन देऊन व्यथा व्यक्त केली. यावेळी जनता शेकडोच्या संख्येने उपस्थितीत नारे लावून आपला रोष व्यक्त करत होती. लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले तर दिवाळीपूर्वी हा प्रश्न सुटण्याचा आशावाद संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्ना यांनी व्यक्त केला. आंदोलनात संजय अनेजा, संजय दाभाडे, महेश बोबाटे, नामदेवराव वासेकर, मंगला भुसारी, नसिजा पठाण आदींसह अनेकजण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मजीप्राने घ्यावी जबाबदारी
चंद्रपूर जिल्हा पाणी पुरवठा संघर्ष समितीचा हा अनेक वर्षापासून आग्रह आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी मंडळ असून यांच्याकडे ज्युनियर इंजिनिअरपासून तांत्रिक सहायक सचिवापर्यंत यंत्रणा आहे. महाराष्ट्रात इतर शहरांप्रमाणे चंद्रपूर शहराची पाणी पुरवठा योजना प्राधिकरणाने हाती घ्यावी त्याकरिता मोर्च्याद्वारे बँडवाजा वाजवित एक निवेदन मजीप्रा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात करण्यात आले.