लिंक फेलमुळे बँकांचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:47 PM2019-02-04T22:47:22+5:302019-02-04T22:47:37+5:30
बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे. बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागरिकांना रोजच बँकेच्या हेलपाट्या कराव्या लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : बिएसएनएल व जिओ कंपनीच्या लिंक सेवा बंद असल्याने शंकरपूर व परिसरातील बँकाचे व्यवहार ठप्प पडले आहे. याचा जोरदार फटका नागरिकांना बसत आहे.
बॅकाचे ग्राहक रोज बँकाच्या चकरा मारीत असून लिंकफेलमुळे दिवसभर बँकेच्या समोर बसून लिंक येण्याची वाट पाहात आहेत. नागरिकांना रोजच बँकेच्या हेलपाट्या कराव्या लागत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शंकरपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून सभोवतालच्या २८ गावांचे बँकींग व्यवहार हे शंकरपूर येथूनच होतात. बँकेचे संपूर्ण व्यवहार हे आॅनलाईन केल्याने लिंक नसल्यास बँकेचे संपूर्ण व्यवहार बंद पडतात. याचा जोरदार फटका नागरिकांना बसतो. अशावेळी बॅकेच्या खात्यामधून आपलेच पैसे काढणे किंवा खात्यात पैसे टाकणे, यासाठी परिसरातील नागरिकांना दुरवरून कामधंदे सोडून शंकरपूर येथे यावे लागते. परंतु बऱ्याच दिवसांपासून लिंक नसल्याने त्यांना आल्यापावली परत जावे लागते.
मध्यवर्ती सहकारी बँक शंकरपूर येथे शंकरपूर व परिसरातील २८ खेड्यातील नागरिकांचे खाते असून या बँकेतून शासकीय कर्मचाऱ्यांचे तसेच व्यापारी वर्गाचेसुध्दा मोठ्या प्रमाणात खाते आहेत. लिंक फेलमुळे या सगळ्यांच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम झाला असून गरजेमुळे नागरिकांना बँकाच्या हेलपाट्या कराव्या लागत आहे.