बँक ग्राहक सेवा केंद्रात सव्वा लाखांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 02:18 AM2016-09-24T02:18:58+5:302016-09-24T02:18:58+5:30
शहरातील आनंदवन चौक नजीकच्या बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाची
वरोरा : शहरातील आनंदवन चौक नजीकच्या बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली नाही. अशा अनेक ग्राहकांचे एक लाख २४ हजार रुपयाची अफरातफर केल्याप्रकरणी वरोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरोरा शहरातील आनंदवन चौकानजीक मागील काही वर्षांपासून बँक ग्राहक सेवा केंद्र सुरू आहे. यातील काही ग्राहक आपल्या खात्यात दरमहा दैनंदिन रोख रक्कम जमा करीत होते.
बँक ग्राहक सेवा केंद्रात कार्यरत काजल रेड्डी (२२) या महिला कर्मचाऱ्याने अनेक ग्राहकांकडून रक्कम घेतली मात्र ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा केली नाही. सदर रक्कम महिला कर्मचाऱ्याने आपल्याकडे ठेवून अफरातफर केली.
याप्रकरणी अनेक ग्राहकांची ओरड सुरू झाल्यानंतर अमित गुजरकर यांनी बँक ग्राहक सेवा केंद्रात १ लाख २४ हजार ४६० रुपयाची अफरातफर झाल्याची तक्रार वरोरा पोलिसात दाखल केली.
वरोरा पोलिसांनी ग्राहक सेवा केंद्रातील महिला कर्मचारी काजल रेड्डी हिच्या विरुद्ध कलम ४२० भांदविने गुन्हा नोंदविला असून फसगत झालेले अनेक ग्राहक वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. यामुळे अफरातफरीच्या रक्कमेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून पोलीस तपासात उघड होईल. (तालुका प्रतिनिधी)