बँक अधिकाऱ्यांची डिजिधन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:40 AM2017-04-15T00:40:23+5:302017-04-15T00:40:23+5:30

केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, ...

Bank Officials Digitization Workshop | बँक अधिकाऱ्यांची डिजिधन कार्यशाळा

बँक अधिकाऱ्यांची डिजिधन कार्यशाळा

Next

आशुतोष सलील : नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे
चंद्रपूर : केंद्र शासनाने सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केले. बँक अधिकारी व नागरिकांसाठी डिजिधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी सलील म्हणाले की, चलनांचा वापर न करता कॅशलेस व्यवहार करण्याकरिता बँकानी नागरिकांना प्रवृत्त करावे तसेच व्यापाऱ्यांना व लहान-मोठया दुकानदारांना पीओएस मशीनचा अथवा चेक व डेबिट कार्ड यासारख्या विविध इलेक्ट्रानिक माध्यमांचा वापर करण्यास सांगावे. त्यामुळे चलनी नोटाही व्यवहारात कमी प्रमाणात लागतील. प्रत्येकास व्यवहारासाठी पुरेशी रोख उपलब्ध होईल. भविष्यात कॅशलेस व्यवहाराने रोख रक्कमेची आवश्यकताही भासणार नाही. परिणामी प्रत्येकाचे आर्थिक व्यवहार सुरळीत तर होतीलच.
सर्वांनी मोठया संख्येने नागरिकांमध्ये जनजागृती करुन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे असे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. या मेळाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीओएस मशीनचे वाटपही दुकानदारांना करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे श्री.रामटेके, इतर बँकाचे व्यवस्थापक, व्यापारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bank Officials Digitization Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.