बँकांनो, तरुणांना कर्ज नाकारू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:55 PM2018-04-09T23:55:56+5:302018-04-09T23:55:56+5:30

जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून येत आहे.

Banks, do not deny loans to youth | बँकांनो, तरुणांना कर्ज नाकारू नका

बँकांनो, तरुणांना कर्ज नाकारू नका

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : मुद्रा बँक कर्ज योजनेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हयातील सुशिक्षीत तरुणांना कर्ज देण्यास बँक उत्सुक नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणावरुन आल्या आहेत. तर काही ठिकाणी कोटा पूर्ण झाला, गॅरंटर हवा अशा चुकीच्या सबबीवर कर्ज देण्यास नकार दिल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुणांना बँकेतून परत पाठवू नका, कोणत्याही कारणासाठी मुद्रा बँक योजनेतून कर्ज नाकारु नका, पतपुरवठा करण्यासाठी कोणतीही अट नसून प्रत्येकाला कर्ज देता येईल, अशा पध्दतीने बँकेने तरुणांना मदत करावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान, खरीप कर्ज वाटप व विविध योजनातून जिल्ह्यातील बँका, विविध मंडळे यांच्याकडून होत असलेल्या पतपुरवठा व त्यावर आधारित राज्य व केंद्राच्या विविध योजनांचा आढावा केंद्रीयय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी सोमवारी घेतला. यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या.
या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा व जिल्ह्यातील सर्व बँकाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी तालुकानिहाय बँकाचा आढावा घेण्यात आला. मुद्रा बँक योजनेच्या संदर्भातही आढावा घेण्यात आला.
यावर्षी मार्च अखरेपर्यंत १४७.५२ कोटी रुपयांचे कर्ज या योजनेअंतर्गत देण्यात आले आहे. या कर्जासाठी जिल्हाभरातून १७ हजार ५१० लोकांनी अर्ज दाखल केले होते. लोकप्रतिनिधींकडे या योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून स्वत: प्रधानमंत्री या योजनेबाबत अतिशय सकारात्मक असून बँकांनी पतपुरवठा करताना विनाकारण अटी व शर्ती घालू नये.
कर्ज घेणाºया नागरिकांनीदेखील अल्पदरातील कर्ज व्यवसाय सुरु करताच परत करावे. अन्य लोकांनादेखील त्याचा फायदा मिळेल, असेही ना. अहीर म्हणाले. यावेळी काही तक्रारींचा त्यांनी उल्लेख केला. तसेच उपजिविका विकास योजनेंतर्गत सुरु असलेल्या व्यवसायाचा आढावाही त्यांनी घेतला. जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वंय सहायता समुहाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या लघु उद्योगाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. यावेळी सर्व बँकांचे अधिकारी व इतर योजनेशी संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

पीक कर्जाचा आढावा
यावेळी जिल्हयातील सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाबाबत ना. अहीर यांनी सूचना केली. पीक कर्ज वाटपात हयगय होऊ देऊ नये, याबद्दल त्यांनी काळजी घ्यायला सांगितली. सन २०१८-१९ या वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिल्यानुसार राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मिळून चंद्रपूर जिल्हयाचा पीक कर्जाचे १०३६.२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सदर उद्दिष्ट सर्व बँकांना कळविण्यात आले असून बँकनिहाय पीककर्ज वाटपाची सूचना सर्व बँकांना देण्यात आली आहे. बँकानी शेतकºयांना तातडीने कर्ज वाटप करावे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Banks, do not deny loans to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.