वाढदिवसासाठी फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:21 PM2018-10-01T23:21:14+5:302018-10-01T23:21:32+5:30

दोन तरुणांनी वाढदिवसासाठी टाटा इंडिकेश कंपनीचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुढे आला. एटीएममधील पैसे चोरण्यास अपयशी ठरल्याने ती मशीन मशीन घंटागाडीत टाकून ठेवली. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बाबुपेठ वॉर्डातील मराठा चौकात ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाबूपेठमधील दोघांना अटक करण्यात यश मिळविले.

Banned ATMs for birthday | वाढदिवसासाठी फोडले एटीएम

वाढदिवसासाठी फोडले एटीएम

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : पाच लाखांची रोकड कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन तरुणांनी वाढदिवसासाठी टाटा इंडिकेश कंपनीचे एटीएम फोडल्याचा प्रकार पुढे आला. एटीएममधील पैसे चोरण्यास अपयशी ठरल्याने ती मशीन मशीन घंटागाडीत टाकून ठेवली. सोमवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास बाबुपेठ वॉर्डातील मराठा चौकात ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाबूपेठमधील दोघांना अटक करण्यात यश मिळविले.
मयूर मधुकर कांबळे (२०) व हर्षल बडगेलवार (१९) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.
पोलीस सूत्रानुसार, मयूर व हर्षल हे दोघेही नागपुरात काम करीत होते. रविवारी मयूरचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी हर्षल बलगेलवार याच्यासह चंद्रपुरात आला. शहरातील बाबूपेठ वॉर्डातील काही मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या दोघांचेही पैसे संपले. दरम्यान, हे दोघेही मराठा चौकात टाटा इंडिकेश कंपनीच्या एटीएमजवळ आले. कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. त्यामुळे कटर मशीन व रॉडच्या सहाय्याने एटीएम कापले. यानंतर त्यांनी ते एमटीएम मशीन मनपाच्या कचरा नेणाऱ्या घंटागाडीत टाकून ठेवले. घटना उघडकीस येताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व शहरचे पोलीस ठाणेदार एस.एस. भगत घटनास्थळावर पोहचले. यानंतर सापळा रचून आरोपींना जाळ्यात घेतले. आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध पोलीस घेत आहे.

Web Title: Banned ATMs for birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.