गोठ्याला आग लागून बकरीसह लाखोंचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:14+5:302021-07-31T04:28:14+5:30
सास्ती : बुधवारी मध्यरात्री २ च्यासुमारास राजुरा तालुक्यातील सोंडो येथील बाजीराव कुरवटकर यांच्या घरालगत असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. ...
सास्ती : बुधवारी मध्यरात्री २ च्यासुमारास राजुरा तालुक्यातील सोंडो येथील बाजीराव कुरवटकर यांच्या घरालगत असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. यात एका बकरीचा मृत्यू झाला असून, तीन बकऱ्या व एक बैल जखमी झाला आहे. यावेळी गोठ्यात असलेला जनावरांचा चारा, शेतीपयोगी लाकडी साहित्य, रासायनिक खत जळून खाक झाले. यात साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.
बुधवारी मध्यरात्री कुरवटकर परिवार व संपूर्ण गाव शांत झोपलेला असताना अचानक घरालगत असलेल्या गोठ्याने पेट घेतला. यावेळी नेहमीप्रमाणे बैल, बकरी, रासायनिक खत, फवारणीचे औषध, वर्षभराचा जनावरांचा चारा, शेतीपयोगी लाकडी नांगर, वखर, डवरा, दोरखंड यासह अन्य वस्तू गोठ्यात होत्या. मात्र हे सर्व साहित्य क्षणात जळून खाक झाले. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने गोठ्यालगत असलेल्या घराच्यासमोरील दरवाजे जळाले. गोठ्यातून निघत असलेल्या धुराचा वास येताच कुरवटकर कुटुंब जागे झाले. आजूबाजूच्या लोकांना माहिती देऊन आग शमविण्याचा प्रयत्न केला; मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने गोठ्याची क्षणात राख झाली. शासनाने मदत द्यावी, अशी मागणी आहे.
300721\img-20210729-wa0038~2.jpg
अनिल गोठ्याला आग लागून सर्व नष्ठ झाले