गोठ्याला आग लागून झोपडी, चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:07+5:302021-05-14T04:27:07+5:30

मानेमोहाळी येथील घटना मासळ (बु) : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानेमोहाळी येथे बुधवारी दुपारच्या सुमारस शार्टसर्किट झाल्याने शेतातील ...

The barn caught fire and the hut and fodder were burnt | गोठ्याला आग लागून झोपडी, चारा जळून खाक

गोठ्याला आग लागून झोपडी, चारा जळून खाक

Next

मानेमोहाळी येथील घटना

मासळ (बु) : येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानेमोहाळी येथे बुधवारी दुपारच्या सुमारस शार्टसर्किट झाल्याने शेतातील झोपडी, चारा व इतर साहित्य जळून खाक झाले.

मानमोहाळी येथील विद्यमान सरपंच राजेंद्र कराळे यांच्या मालकीची शेतजमीन गावालगत असून, शेतात झोपडी आहे. ते गावात दुग्धव्यवसाय करीत आहेत. झोपडी जवळून विद्युततारा वाहत असून कदाचित शार्टसर्किट झाल्याने शेतातील झोपडीला आग लागली असावी, असा अंदाज वर्तविल्या जात आहे. यामध्ये जनावराचा चारा व इतर साहित्य जळून खाक झाले. मात्र सुदैवाने दुधाळ जनावरे चराईसाठी बाहेर गेल्याने मोठी हानी टळली.

याची शेतमालक राजेंद्र कराळे यांनी तहसीलदार चिमूर यांना दिल्याने घटनास्थळावर तत्काळ अग्निशामक दलाचे वाहन पाठवून आग आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. यामध्ये कराळे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. घटनेचा पंचनामा म्हसलीचे तलाठी ढोले यांनी केला.

Web Title: The barn caught fire and the hut and fodder were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.