बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेतील पुस्तकांसाठी पाच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:15+5:302021-09-26T04:30:15+5:30
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबच्या वतीने बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेत अभिवादन कार्यक्रम पार पडला. ...
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबच्या वतीने बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिकेत अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आ. उपेंद्र शेंडे, रिपब्लिकन नेते कुशाल तेलंग, रामसिंग सोहेल, देशक खोब्रागडे, शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष रामू तिवारी, जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमूख, धम्मचक्र स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष तथा नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेविका पुष्पा मून आदी उपस्थित होते.
आ. जोरगेवार पुढे म्हणाले, अभ्यासिकेत अपुऱ्या सोइ-सुविधा आहेत. त्यामुळे येथील अभ्यासिकेत दोन संगणक देण्यासह पुस्तकांसाठी पाच लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
बॉक्स
रिपब्लिकन पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा
चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसर चंद्रपूर येथे अभिवादन कार्यक्रम, पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील ७०-८० स्त्री-पुरुषांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ रिपब्लिकन नेते अशोक निमगडे यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. विवेक बांबोळे, ज्योती जिवणे, गौरीशंकर टिपले यांचा सामाजिक कार्यात भरीव योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. मंचावर सुदाम खोब्रागडे, प्रा. डॉ ज्योती राखुंडे, सूर्यभान शेंडे उपस्थित होते. संचालन अश्विनी खोब्रागडे, प्रास्ताविक विशालचंद्र अलोणे तर आभार लिना खोब्रागडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रेमदास बोरकर, प्रतीक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, अनिल अलोने, हरिदास देवगडे, नागसेन वानखेडे, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, गीता रामटेके, ज्योती शिवणकर अश्विनी आवळे, अनिता जोगे, माणिक जुमडे आदींनी परिश्रम घेतले.