बॅरि. खोबरागडे यांचे कार्य प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:39 PM2018-09-25T22:39:54+5:302018-09-25T22:40:12+5:30
असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : असामान्य व्यक्तिमत्त्व आणि त्याला कर्तृत्वाची जोड दिल्यामुळेच बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांचे कार्य व कर्तृत्व देशपातळीवर पोहोचले आहे. सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांनी चंद्रपूरचा नावलौकिक देश पातळीवर वाढविले. त्याचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
मंगळवारी बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ुबॅरि. राजाभाऊ खोबरागडे मेमोरियल चंद्रपूर व खोबरागडे परिवारातर्फे स्थानिक बॅरि. राजाभाऊ खोबरागडे चौकातील बॅरि. राजाभाऊ खोबरागडे यांच्या पुतळ्याला मालार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. आली. त्यानंतर खोबरागडे भवन येथे बुद्ध-धम्म-संघ वंदना घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, काँग्रेस नेते राहुल पुगलिया, मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, रिपब्लिकन नेते प्रविण खोबरागडे, नगरसेवक राहुल घोटेकर, सतीश घोडमोडे, नगरसेविका सविता कांबळे, आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री अहीर पुढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बॅ. खोबरागडे यांनी आपले कर्तृत्व पणाला लावले. खऱ्या अथार्ने ते बाबासाहेबांचे सहकारी आणि असामान्य उंचीचे नेते होते. डॉ. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याला वाहून घेतांना त्यांनी संगठकांची भूमिका उत्तम वठवल्याने त्यांना देशपातळीवर सन्मान प्राप्त झाला. अशा या महान नेत्यांचे विचार समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी अंगिकारावे, असे ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थितांनी अभिवादन केले. त्यानंतर हेमंत शेंडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.