दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:30 PM2018-01-07T23:30:10+5:302018-01-07T23:31:48+5:30

खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले.

The base of 60 handpumps for ten thousand citizens | दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

दहा हजार नागरिकांना ६० हातपंपांचा आधार

Next
ठळक मुद्देसाडेतीन कोटींची योजना : तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच

आॅनलाईन लोकमत
कोठारी : खनिज विकास निधीअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरद्वारा कोठारी पाणी पुरवठा योजना व जलशुद्धीकरण केंद्र सप्टेंबरमध्ये कार्यान्वित करण्यात आले. तरीही कोठारीवासीयांची घागर रिकामीच असल्याने पाण्याची समस्या जैसे थे आहे. परिणामी चातकाप्रमाणे वाट पाहणाºया दहा हजार नागरिकांची तहाण भागविण्यासाठी ६० हातपंपाचा आधार घ्यावा लागत आहे.
कोठारीतील जुनी पाणीपुरवठा योजना ग्रा.पं. प्रशासन व पदाधिकाºयांच्या निष्क्रीयतेमुळे मागील सहा वर्षांपासून ठप्प झाली होती. वीज वितरण कंपनीचे वीज देयक भरण्याची पत ग्रामपंचायतीची नसल्याने पाणीपुरवठा सहा वर्षापासून ठप्प झाला. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी ती सुरू करण्यासाठी कधीही तत्परता दाखविली नाही. परिणामी कोठारीत मोठी पाणी समस्या निर्माण झाली.
दहा हजाराच्यांवर लोकांना पाण्यासाठी हातपंपावर अवलंबून राहावे लागले. ही समस्या आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जाणली. त्यासाठी त्यांनी विधानसभेत खनिज विकास निधी अंतर्गत विशेष बाब म्हणून साडेतीन कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. वर्धा नदीचे पाणी शुद्ध करून १ लक्ष ६० हजार लिटर पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचे बांधकाम पूर्ण केले. ग्रा.पं.च्या निवडणुका तोंडावर असताना या योजनेचे उद्घाटन करून कार्यान्वित करण्यात आली. नळाद्वारे पाणी घरात सुरू झाले.
नळयोजनेची चातकाप्रमाणे प्रतिक्षा करणाऱ्या गावकऱ्यांना आनंद झाला. मात्र हा आनंद क्षणभरात नाहीसा झाला. नळाची जुनी पाईपलाईन नादूरुस्त होती. जागोजागी पाईप फुटल्या अवस्थेत होते. ते न बदलविल्यामुळे पाईपमधून पाणी जमिनीत मुरू लागले. नळात पाणी येत नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अशात गावकºयांनी ग्रा.पं.ची परवानगी न घेता वॉर्ड सदस्यांना हाताशी धरून नळजोडणी केली व पाण्याची प्रतीक्षा करू लागले.
नळाद्वारे पाणी येत नसल्याची बाब गावकऱ्यांनी ग्रा.पं.च्या नजरेत आणून दिली. ग्रा.पं.ने पत्रव्यवहार करून जुनी पाईपलाईन बदलविण्याची व नळयोजना सुरळीत करण्याची मागणी केली. सद्या नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. नवीन नळयोजनेच्या नळाद्वारे येणारे पाण्याची तपासणी न करता व त्यातील त्रुट्या पूर्ण न करता घाईने उद्घाटन करणे नडले. अखेर गावकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: The base of 60 handpumps for ten thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.