विदर्भाच्या मागणीसाठी आता आरपारची लढाई
By admin | Published: November 11, 2016 01:02 AM2016-11-11T01:02:15+5:302016-11-11T01:02:15+5:30
विदर्भामध्ये वनसंपदा , खनिज , विज , पाणी मुबलक प्रमाणात असून विदर्भ राज्य झाल्यास हे संपन्न राज्य होऊन विदर्भवासीयांचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे .
वामनराव चटप : आंदोलनाने पेटविणार मागणी
चिमूर : विदर्भामध्ये वनसंपदा , खनिज , विज , पाणी मुबलक प्रमाणात असून विदर्भ राज्य झाल्यास हे संपन्न राज्य होऊन विदर्भवासीयांचा सर्वांगिण विकास साधला जाणार आहे . विदर्भ राज्याची ११३ वषार्पांसून मागणी असून राज्य व केंद्र सरकार शेकडो वर्षांपासून गांभिर्याने विचार करून राज्याच्या मागणीला बगल देत आहेत, त्यामुळे आता राज्यासाठी जनता आरपारची लढाई करणार असल्याची माहिती चिमूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे प्रमुख समन्वयक अँड . वामनराव चटप यांनी दिली .
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ५ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर विशाल मोर्चा व ठिय्या आंदोलन आयोजित केले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून विदर्भभर वातावरण निर्मिती केली जात आहे त्याकरिता गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. अँड . चटप यांनी सांगितले की , विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या चारवर्षांपासून आंदोलने झालीत. मात्र केंद्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. प्रधानमंत्री व गृहमंत्र्यांनी भेटीकरिता वेळही दिला नाही. लेखी निवेदने, पत्र आदींची दखल न घेऊन भाजपाच्या केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रती सवेदना नसल्याचे दिसून येते .
अँड. चटप यांनी सांगितले की वैदर्भाय जनतेला दिलेले विदभार्चे आश्वासन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता दिलेले आश्वासन, शेतकरी आत्महत्या यावर केंद्र सरकार कोणतेही निर्णय घेत नाही. विदर्भ राज्य करू, अशी हाकाटी पिटणारे भाजपाचे मोठे नेते मौनीबाबा झालेले आहेत. म्हणूनच या सर्व प्रश्नांकरिता मोर्चा व ठिय्या आंदोलन असून १ जानेवारीपासून ‘विदर्भ मिळवू औंदा’, या घोषणेप्रमाणे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
५ डिसेंबरच्या आंदोलनाकरिता विदर्भाच्या पाच सीमा भागातून पाच विदर्भ दिंडीयात्रा निघणार असून ५ डिसेंबरला नागपूरला दुपारी १२ वाजता पाच मार्गांनी पोहचतील. दुपारी १ वाजता विधान भवनावर मोर्चा निघेल. पहिली दिंडी सिंदखेडराजा (बुलढाणा) वरून, दुसरी उमरखेडवरून, तिसरी देवरी (गोंदिया), चौथी दिंडी शेंडगाव (गाडगेबाबांचे जन्मगाव), पाचवी दिंडी कालेश्वर (गडचिरोली) येथून निघणार असल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजभे, किशोर पोतनवार, आपच्या महिला आघाडी अध्यक्षा रंजना मामर्डे , अँड . हिराचंद बोरकुटे , सचिव नागपूर विभाग मितीन भागवत , प्रा. डॉ . सोपान चिकटे, चिमूर तालुका अध्यक्ष नरेंद्र बंडे, उपाध्यक्ष प्रा. संजय पिठाळे उपस्थीत होते. (तालुका प्रतिनिधी)