ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:30 AM2019-07-14T00:30:19+5:302019-07-14T00:30:53+5:30
सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : सत्तेत राहून मलीदा खायचा आणि शेतकऱ्यांविषयी वेगळे प्रेम दाखवायचे, असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील २५ टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळालाच नाही. म्हणूनच क्राँग्रेसची सत्ता येऊ द्या. एका दिवसात बँकांना वठणीवर आणणार. ही लढाई विधानसभा निवडणुकीपुरती नसून ही लढाई बहुजनांच्या अधिकाराची आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
चिमूर येथील शेतकरी भवन येथे शनिवारी आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व सत्कार समारंभात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
आ. विजय वडेट्टीवार यांची नुकतीच विरोधी पक्षनेते नेते म्हणून निवड झाली तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून बाळू धानोरकर विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्याचा सत्कार समारंभ व कांग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ अविनाश वारजूकर तर कार्यक्रमाचे उदघाटक तथा सत्कारमूर्ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सत्कारमूर्ती खासदार बाळूभाऊ धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश देवतळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, विनोद दत्तात्रय, पंजाबराव गावंडे, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. सतिश वारजुकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष माधवबापु बिरजे, ममता डूकरे, संजय डोंगरे, घनश्याम डुकरे, जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. बाळू धानोरकर म्हणाले, देशात भाजपाचे तीनशेच्या वर खासदार निवडणून आले. मात्र एकाही खासदाराच्या चेहºयावर त्याचा आंनद दिसत नाही. हे निवडून आलेले खासदार देशाच्या हिताचे काम न करता फक्त मोदी मोदी असा संसदेमध्ये जाप करतात. याने देशाचे भले होणार नाही. कोळसा माफियाला पाठिशी घातल्याने भाजपाचा विरोध करायला लागलो. आणि यामुळेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सतिश वारजुकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही मार्गदर्शन केले.