बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

By admin | Published: July 16, 2015 01:17 AM2015-07-16T01:17:45+5:302015-07-16T01:17:45+5:30

जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात.

Baussa's Rules? How to make a damn green shawl! | बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

बा पावसा का रुसलास ? : धरणीमातेला हिरवा शालू कसा नेसवणार!

Next

बळीराजाचे डोळे आभाळाकडे !
चंद्रपूर : जुलै महिन्यात सर्वत्र पावसाचे थैमान असते. पेरणीची कामे संपल्यानंतर काळ्या मातीवर हिरवीगार पिके डोलताना दिसतात. मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व पेरण्या कडाक्याच्या उन्हामुळे करपू लागल्या आहेत. बळीराजाचे अश्रूभरले डोळे एकटक आभाळाकडे लागले आहे.
आधीच शेतकरी महागाई, कर्ज यामुळे खचून गेला आहे. यंदा तरी निसर्ग साथ देईल अशा आशेत शेतकऱ्यांनी प्रारंभी तीन दिवस पाऊस पडल्यानंतर मोठ्या जोमात पेरण्या आटोपल्या. मात्र शेतकऱ्यांना नेहमीच दगा देणाऱ्या पावसाने यावेळीदेखील दगाच दिला आहे. अलिकडच्या काळात शेतकऱ्यांना खडतर दिवस पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाच्या सरीने रुजलेल्या बियांना चांगलेच अंकूर फुटले. मात्र मातीतून उगविलेल्या रोपाची अर्धा फूट उंचीही वाढली नाही आणि पावसाने दडी मारली. मागील २० दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. ढगाळ वातावरण व आभाळात कडकडाट होतो. मात्र पाऊस पडत नाही. आज पाऊस पडेल, उद्या पडेल, या आशेवर शेतकरी एक एक दिवस चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत आहे. दररोज देवदेवतांना साकडे घालत आहे. मात्र देवदेवतांसह निसर्गही शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे दिसते.
चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यातील १५ टक्के शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा असतील. उर्वरित शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मात्र निसर्ग दगा देत असल्याने या शेतकऱ्यांच्या पेरण्या करपत चालल्या आहेत. डोळ्यादेखत पेरण्या मातीमोल होत असतानाही शेतकऱ्यांना काहीही करता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी जूनमध्ये तीन दिवस आलेल्या पावसानंतरही पेरण्या केल्या नाही. आणखी पाऊस पडेल तेव्हा पेरण्या करू, अशा मानसिकतेत हे शेतकरी होते. मात्र त्यानंतर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जुलै महिन्याचा पंधरवाडा लोटला तरी या शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या नाही.
आणखी आठवडाभर पाऊस आला नाही तर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. त्यानंतरही पाऊस पडला नाही तर यंदा दुष्काळ निश्चित मानला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
पहाडावरील पिके करपली
माणिकगड पहाडावर सिंचनाच्या सुविधा नाही. पावसाचे पाणीच शेतकऱ्यांचा आधार आहे. येथील शेतकरी खरीप हंगामावरच अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूल, उडीद या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी जूनमध्येच केली. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके करपून जात आहे. येथील शेतकरी गरीब आहे. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणांची खरेदी कुठून करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी विभागाचे अद्याप सर्वेक्षण नाही
मागील २० दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडला नाही. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके सुकत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष नाही. कृषी विभागाने तर या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे सौजन्यही यंत्रणेने अद्याप दाखविले नाही.
उन्हाची काहिलीही वाढली
जुलै महिना म्हणजे पावसाचा महिना. या महिन्यात खरंतर अनेक ठिकाणी नदीनाले भरून पूरपरिस्थिती निर्माण होते. मात्र यावेळी या महिन्यात पावसाचा थेंबही नाही. उलट उन्हाची काहिली वाढून नागरिकांना उन्हाळ्यासारखे जाणवू लागले आहे. काढून ठेवलेले कुलर पुन्हा सुरू झाले आहे.

 

Web Title: Baussa's Rules? How to make a damn green shawl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.