सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:26 AM2019-09-10T00:26:01+5:302019-09-10T00:26:35+5:30

गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.

Be aware of social responsibility | सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवा

Next
ठळक मुद्देप्रशांत खैरे : गडचांदूरमध्ये पार पडली शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : गणेशोत्सव हा भारतीय संस्कृती जोपासणारा सण असून गणेश विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे मत चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचांदूरच्या विद्यमाने गडचांदूर येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित गणेश मंडळ, शांतता समिती सदस्य, तंटामुक्त समिती, पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून कोरपनाचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, गडचांदूरचे मावळते ठाणेदार विलास चव्हाण, नवनियुक्त ठाणेदार गोपाल भारती, कोरपना ठाणेदार नरेंद्र कोसुरकर, पाटणचे ठाणेदार संदीप हिवाळे, जिवतीचे ठाणेदार सुमित खैरकार, पिटीगुडा ठाणेदार अनिल मालेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील धोकटे, नासीर खान आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. गणेश मंडळांनी स्वच्छता उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, दारुबंदी उपक्रम, गुलाल मुक्त विसर्जन, सर्वधर्मसमभाव विषयक उपक्रम तसेच उत्कृष्ट देखावा करून गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, संचालन प्रा. आशिष देरकर यांनी तर आभार ठाणेदार गोपाल भारती यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व पोलीस बांधवांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील तंटामुक्त समिती अध्यक्ष, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Be aware of social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.