काळजी घ्या, डेंग्यू ताप टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:01:29+5:30
एडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळा सुरू झाला की, विविध आजार डोकेवर काढतात. या दिवसात डेंग्यू, मलेरिया आदी आजारांच्या रूग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होते. हा आजार पावसाळा संपत असताना आणखी बळावतो. डेंग्यूची लागण झाली की, मृत्यू ओढवतो, अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, योग्य काळजी घेतल्यास डेंग्युलाही पळविता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी, तसेच सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एडीस डासाच्या मादीमुळे पसरतो. डेंग्यूचा ताप महाभयानक असतो. उपचाराअभावी रूग्ण दगावतातही. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. डेंग्यूमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तीव्र ताप, डोकेदुखी, दलटी, अंगदूखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, सुस्त व बेशुध्द होणे तर गंभीर डेंग्यू रूग्णांचा रक्तपेशी कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे मृत्यूदेखील होतो. पावसाळ्याच्या अखेरीस डेंग्यूचा धोका अधिक बळावत असून नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेसोबत घरामध्येही स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.
एडीस डासाची वैशिष्ट्ये
एडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यापासून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास असलेली भांडी धुवून, पुसून स्वच्छ ठेवावी, जेणेकरून त्यांची पृष्ठभागाला चिकटलली अंडी नष्ट होतील.
भरपूर पाणी प्यावे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
आजाराची लागण झालेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, लक्षणानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात डेंग्यूचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाणी साचणाºया परिसरात नियमित स्वच्छता करावी. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी कोरडी करून पाणी भरावे. घराशेजारी सांडपाणी साचू न देता ते वाहते करावे यामुळे डेग्यू आजार होण्यापासून टाळता येईल.
आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देवू नये, घरातील पाणी साठवणीची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. तपासणीसाठी घरी येणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
- डॉ. ए. एन. कुकडपवार, जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूर
अशी रोखा
डासांची उत्पत्ती
घराभोवती, परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरूपयोगी वस्तू साठवू नये. खराब टायर्स नष्ट करावेत, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवावे, घरातील टाक्यांना झाकणे बसवावी, शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवाव, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरातील डबकी वाहती करावी, मोठ्या उबक्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावे, साचलेल्या पाण्यात कू्रड आईल किंवा रॉकेल टाळावे, शेणखताचे ढिगारे गावापासून दुर अंतरावर न्यावे यामुळे आजार टाळता येईल.