काळजी घ्या, कोराेनाचा डबलिंग रेट ८६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:36+5:302021-04-06T04:27:36+5:30

बाॅक्स औषधी साठा पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी औषधी साठा पुरेशा प्रमाणात आहे. निधीचीही उपलब्धता आहे. कोविशिल्ड ...

Be careful, Corina's doubling rate is 86 | काळजी घ्या, कोराेनाचा डबलिंग रेट ८६ वर

काळजी घ्या, कोराेनाचा डबलिंग रेट ८६ वर

Next

बाॅक्स

औषधी साठा पुरेशा प्रमाणात

जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी औषधी साठा पुरेशा प्रमाणात आहे. निधीचीही उपलब्धता आहे. कोविशिल्ड लसीचाही तुटवडा जाणवत असला तरी त्या उपलब्ध होत आहेत. त्यानुसार लसीकरण सुरू आहे.

ऑक्सिजन उपलब्ध

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. दोन एजंसीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. दोन दिवसांत रिफिलींगचे टेंडर काढले जाणार आहे.

मनुष्यबळ वाढविण्यासाठी रिक्त जागा भरणार

स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर आवश्यक तेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, फिजिशीयन व भूलतज्ज्ञांची कमतरता आहे. या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

डेरा आंदोलन चुकीचे

कंत्राटी कामगारांचा २०१८ ची निविदाच चुकीच्या पद्धतीने निघाली होती. निविदेनुसारच या कामगारांना वेतन दिले जात आहे. ज्या बाबीचा उल्लेखच निविदेत नाही. त्यानुसार पगार कुठून देणार? असा सवाल उपस्थित करून डेरा आंदोलन चुकीचे असल्याने ते इतके दिवस सुटू शकले नसल्याचेही पालकमंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले. ही निविदाप्रक्रिया यापूर्वीच्या सरकारच्या काळात झाली. त्यावेळी दोन कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. मात्र, चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

वैद्यकीय मेडिकल काॅलेजबाबत अहवाल मागविला

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत तीन दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अहवाल येताच जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेतही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

Web Title: Be careful, Corina's doubling rate is 86

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.