सावधान ! कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडाही वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:26 AM2021-03-28T04:26:53+5:302021-03-28T04:26:53+5:30

जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची ...

Be careful! The death toll is also rising with corona patients | सावधान ! कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडाही वाढतोय

सावधान ! कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडाही वाढतोय

Next

जिल्ह्यात मागील २४ तासात १०३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ९२४ वर पोहोचली आहे. तसेच सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६४५ इतकी झाली आहे. सध्या १८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६८ हजार ३९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ३६ हजार ६११ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये सावरगाव ता. नागभीड येथील ५८ वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील ६० वर्षीय व ६५ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३८१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधित आलेल्या २२३ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ७२, चंद्रपूर तालुका २१, बल्लारपूर १४, भद्रावती १७, ब्रम्हपुरी सात, नागभीड १८, सिंदेवाही चार, मूल १०, सावली दोन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजूरा नऊ, चिमूर ११, वरोरा २५, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

आठवडाभरातील मृत्यू

२० मार्च - ०१

२१ मार्च - ०२

२२ मार्च - ०३

२३ मार्च - ००

२४ मार्च - ००

२५ मार्च - ०२

२६ मार्च - ०२

२७ मार्च - ०३

Web Title: Be careful! The death toll is also rising with corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.