वाढदिवस रस्त्यावर साजरा कराल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:31 AM2021-09-21T04:31:22+5:302021-09-21T04:31:22+5:30
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यातच स्वत:चे अस्तित्व तसेच सोबत राहणाऱ्या मित्रमंडळींना खूश करण्यासाठी काही ...
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यातच स्वत:चे अस्तित्व तसेच सोबत राहणाऱ्या मित्रमंडळींना खूश करण्यासाठी काही जण आपला वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर साजरा करीत आरडाओरड करतात. एवढेच नाही तर अनेकवेळा केक कापण्यासाठी तलवारीचाही उपयोग करतात. मात्र, हे करणे चुकीचे असून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवूनच वाढदिवस साजरा करावा लागणार आहे. विशेषत: काही तरुण रात्रीच्यावेळी केक कापत वाढदिवस साजरा करतात. अनेकवेळा फटाके फोडून नागरिकांना त्रास होईल, असे काम करतात. त्यामुळे सामाजिक भान राखत वाढदिवस साजरा केला पाहिजे.
बाॅक्स
...तर गुन्हा होणार दाखल
डीजे लावून रस्त्यावर गोंधळ घालणे
मध्यरात्री फटाके वाजविणे
सार्वजनिक नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचविणे
बाॅक्स
या भागात वाढले प्रकार
बाबूपेठ, बंगाली कॅम्प, जुनोना जंगल, दाताळा पूल, मोहूूर्ली जंगल परिसर, इरई डॅम परिसर यासह काही निर्जनस्थळी तसेच घुग्घुस आणि बल्लारपूरमध्येही तलवारीने केक कापणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचे प्रकार वाढले आहे.
बाॅक्स
अनेकवेळा दमदाटीही
रस्त्यावर वाढदिवस साजरा करताना अनेकवेळा मित्रमंडळी सोबत असते. अशावेळी एखाद्याने हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरच दमदाटी केली जाते. त्यामुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांकडे दुर्लक्षच केले जाते.
बाॅक्स
पोलिसांनी वाढवावी गस्त
मागील काही दिवसांपासून तलवारीने केक कापण्यासह रस्त्यावर वाढदिवस साजरे केले जात आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल करीत आपण किती मोठे आहो, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांवर आळा घालण्यासाठी अधिकाधिक गस्त वाढविणे गरजेचे आहे.