पत्नीच्या नावे संपती घेताना सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 01:54 AM2016-07-31T01:54:43+5:302016-07-31T01:54:43+5:30
भारतीय परिवार बचाव संघटनेच्या वतीने पत्नी पिडीत पुरुषांची सभा घेण्यात आली पत्नीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष
नंदकिशोर मैंदळकर : पत्नी पीडितांचे चर्चासत्र
चंद्रपूर : भारतीय परिवार बचाव संघटनेच्या वतीने पत्नी पिडीत पुरुषांची सभा घेण्यात आली पत्नीच्या अत्याचाराला बळी पडलेले पुरुष व कुटुंबासमावेत पीडितांचे चर्चासत्र घेण्यात आले.
चर्चासत्राचे अध्यक्ष भारतीय परिवार बचाव संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर होते. तर प्रमुख पाहुणे संघटनेचे सल्लागार अॅड. संदीप नागपुरे, सुदर्शन नैताम, डॉ. राहुल विधाते, शीतल साळवे, गोपी आक्केवार, किशोर जंपलवार, मनोज ताटे, गंगाधर गुरनुले, योगेश निखाडे आदी उपस्थित होते.
डॉ.मंैदळकर म्हणाले, पुरुष प्रधान संस्कृती नावापुरतीच राहिली आहे. आज ७० टक्के घरात स्त्रियांचे राज चालत आहे. बरेच नवरोबा बायकोच्या मागे फिरताना दिसतात. तिला नवऱ्यावर धाक असल्याचा अभिमान वाटतो. परंतु घरंदाज स्त्रियांना आजही वाटते की, घरात पुरुषांचा धाक असल्याशिवाय घराला घरपण नाही. पुरुष कुटुंबाची प्रगती करण्याकरिता जीवच रान करतो. तर पत्नी कौटुंबिक वाद उकरून काढते. हुंडाबळीचा कायदा ४९८ (अ) लावून संपूर्ण कुटुंबाला गजाआड करण्याची धमकी देते. विवाह संस्थेचे पावित्र्य नष्ट झालेले आहे. विवाहाला व्यवसायाचे स्वरूप येत आहे. सदर प्रकरणात पुरुष कुटुंबाची मानहानी, संपत्तीचे नुकसान, सामाजिक बदनामी, कौटुंबिक हानी होत आहे. या प्रकरणात पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्यासुद्धा करीत आहे. पतीवर पोटगीची केस लावून हताश करून सोडतात. आत्महत्या हा पर्याय नाही. पतींनो संघर्ष करा. आमची संघटना तुमच्या पाठिशी आहे, असे आवाहन त्यांनी केले. संचालन पोपी आक्केवार तर आभार मनोज ताटे यांनी मानले. (प्रतिनिधी)