सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:34 AM2019-05-17T00:34:44+5:302019-05-17T00:34:59+5:30
सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असा सल्ला बल्लारपूरचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक नवनीतकुमार कावत यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातून लोकांना लुबाडल्या जात आहे. काही व्यक्ती आर्थिक लोभापायी गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे. शिवाय इतरांना जागरूक राहण्यास सांगावे. गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असा सल्ला बल्लारपूरचे परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक नवनीतकुमार कावत यांनी केला.
रमजान महिना व बुद्ध जयंतीनिमित्त बल्लारपूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची सभा झाली. त्यात सायबर गुन्ह्यांची माहिती देताना ते बोलत होते. परिविक्षाधिन पोलीस अधीक्षक कावत म्हणाले, व्हॉटस्अॅप येणारा कोणताही संदेश वाचल्यानंतर तो लगेच फॉरवर्ड करू नये. धार्मिक भावना दुखावणारे संदेश तर मुळीच पाठवू नये. तसे संदेश आल्यास पोलिसांना कळवावे, असेही त्यांनी सभेत सांगितले. शांतता कमिटीच्या सदस्यांनी काही सूचना मांडल्या. या सूचनांची पोलीस प्रशासनाने नोंद घेतली. न. प. सभापती विनोद यादव, माजी नगर सेवक राजू दारी, वसंत खेडेकर, अजय दुबे, शिवचंद द्विवेदी, न.प.चे माजी उपाध्यक्ष संपत कोरडे, शेख उस्मान, जावेद खान, शेख बब्बू, रवी मातंगी, विश्वास देशभ्रतार, विनोद स्वामी, आर.एन. अडूरवार आदी उपस्थित होते. संचालन सुभाष शिडाम यांनी मानले.