नववर्षाचा जल्लोष करा पण कायदा सांभाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:57 PM2017-12-30T23:57:10+5:302017-12-30T23:57:23+5:30
३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. चंद्रपुरातील विविध हॉटेल्स, लॉन, मैदाने या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र पार्टीची मज्जा घेताना प्रत्येकाला कायदा सांभाळावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. चंद्रपुरातील विविध हॉटेल्स, लॉन, मैदाने या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मात्र पार्टीची मज्जा घेताना प्रत्येकाला कायदा सांभाळावा लागणार आहे. कुणाकडून इतरांना त्रास होऊ नये, कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांची करडी नजर असणार आहे.
जिल्हा पोलीस नियती ठाकर व अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त ठेवला आहे. जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, स्ट्रॉयकिंग फोर्स, नक्षल विरोधी पथक, बॉम्ब शोधक पथक, दहशतवादीविरोधी पथक आदी पथके तैनात असणार आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज, धाबे, अस्थापना येथे सर्च मोहीम राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण जिल्ह्यात शंभर अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी तैनात असणार आहे. त्यामुळे मद्यपींवर करडी नजर राहणार आहे.
२० ठिकाणी नाकेबंदी
चंद्रपूर शहरात येणाºया मार्गावर २० ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील मुख्य चौक व इतर ठिकाणी असे एकूण ६० फिक्स पार्इंट नेमण्यात आले आहे. नाकाबंदी व फिक्स पार्इंट या ठिकाणी शस्त्रासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहे. मद्यपींची तपासणी करण्याकरिता ब्रेथ अॅनालायझरची मदत घेण्यात येणार आहे.