कुष्ठरोगींच्या आनंदासह दु:खातही सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:31 PM2017-12-26T23:31:55+5:302017-12-26T23:33:03+5:30

‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत.

Be in pain with the joy of lepers | कुष्ठरोगींच्या आनंदासह दु:खातही सहभागी व्हावे

कुष्ठरोगींच्या आनंदासह दु:खातही सहभागी व्हावे

Next
ठळक मुद्देविकास आमटे : समाजदिन म्हणून कर्मयोगी बाबा आमटे जयंती साजरी

आॅनलाईन लोकमत
वरोरा: ‘सुंदर मी होणार नाही, तर सुंदर मी करणार’ या वाक्यातून प्रेरणा घेवून जगभर अनेकजन सामाजिक भान जपत आहेत. अनेक व्यक्ती कुष्ठरोगाच्या आनंदात सहभागी होतात तसेच दु:खतही सहभागी व्हावे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त आनंदवनात आयोजित समाज दिन कार्यक्रमात मंगळवारी केले.
कर्मयोगी बाबा आमटे यांचा जन्म दिन समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आज आनंदवनात अनाम वृक्षांची स्मरणशीला आणि अनाम मूक कळ्यांचीस्मरण शिला तसेच कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या समाधीला मान्यवरांच्या हस्तेपुष्पचक्र अर्पण करुन कर्मयोगी बाबा यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आनंदवन निर्मित स्वरानंद आर्केष्ट्राच्या चमूने बाबांची गीते सादर करुन बाबांच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी संचिताचे कवडसे या लेख मालिकेतील डॉ. विकास आमटे यांच्या लेखाचे आणि कर्मयोगी बाबा आमटेच्या कवितांचे वाचन करण्यात आले. यावेळी निलकृष्ण देशपांडे लिखित महामानव गीत वंदना या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, गुलानी, सुधाकर कडू, डॉ. विजय पोळ, सदाशिव ताजने, गौतम करजगी, पल्लवी आमटे, सोमनाथ रोडे, प्रा. श्रीकांत पाटील, आनंद निकेतन महाविद्यालय वरोराचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, शेखर नाईक, माधव कविश्वर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, जोडो भारत अभियानात सहभागी मंडळी, आनंदवन मित्र मंडळ वरोरा, आनंदवनातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र नलगरीवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘जोडो भारत’ या गिताने झाली.

Web Title: Be in pain with the joy of lepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.