अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:56+5:302021-02-07T04:25:56+5:30

चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेड सामाजिक काम करणारी संघटना आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येतील. काही ...

Be prepared to fight against injustice | अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी ठेवा

अन्यायाविरुद्ध संघर्षाची तयारी ठेवा

googlenewsNext

चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेड सामाजिक काम करणारी संघटना आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येतील. काही प्रश्न निवेदनाने सुटतील, तर काही प्रश्न संघर्षातून सोडवावे लागतील. त्यामुळे अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे, आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

घुग्घुस-नकोडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अनेक युवक व महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा.पं. सदस्या ममता मोरे, सोनाली ऐंगलवार, अरुणा पटेल, माजी उपसरपंच हनिब मोहम्मद, शेख कासम, राजू तिरणकर, गणपत गेडाम, यंग चांदा ब्रिग्रेडचे नेते इमरान खान, माजी सैनिक नितीन मांदाडे, स्वप्निल वाढई आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, घुग्घुस शहरात अनेक मोठे उद्योग आहेत. मात्र, स्थानिक युवक रोजगारापासून वंचित आहेत. या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, ही आपली भूमिका असून, विविध कंपनी व्यवस्थापनासोबत माझ्या बैठका सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश घेतलेल्या नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात संघटनेचा दुपट्टा घालून आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार केला.

Web Title: Be prepared to fight against injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.